तरुण भारत

समीर वानखेडे यांच्या ‘त्या’ फोटोमुळे प्रकरणाध्ये ट्विस्ट

ऑनलाईन टीम / मुंबई

अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यन खान(Aryan khan) ड्र्ग्ज प्रकरणाध्ये नवाब मलिक (Nawab malik) यांनी समीर वानखेडेंच्या(Sameer wankhede) पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा फोटो ट्विट केला आणि वानखेडे हे मुस्लिम असल्याचं सांगून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवल्याचा दावा मलिक यांनी केलाय.आर्यन खान ड्र्ग्ज प्रकरणाध्ये आमने-सामने आलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (NCB) विभागीय संचालक समीर वानखेडे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तसेच महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्यामधील आरोप प्रत्यारोपांमध्ये या फोटोमुळे प्रकरणाध्ये ट्विस्ट आला आहे
.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या पहिल्या लग्नातील रिसेप्शनचा एक फोटो ट्विट केला व असा आरोप केला की वानखेडे यांनी मुस्लिम असल्याचं सांगून चुकीच्या पद्धतीने कागदपत्रांचा वापर करुन नोकरी मिळवली आहे. दरम्यान समीर वानखेडे यांनी हे आरोप फेटाळून लावले असून आपण न्यायालयातच उत्तर देऊ अशी प्रतिक्रीया दिली आहे.

तर दुसरीकडे या प्रकरणावरुन समीवर वानखेडेंची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरनेही (kranti Redekar)पती समीर यांच्यासोबतच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत मलिक यांना “मी आणि माझे पती समीर दोघेही जन्माने हिंदू असुन आम्ही कधीही कोणत्याही धर्मामध्ये धर्मांतर केलेलं नाही. आम्हाला सर्व धर्मांचा सन्मान आहे. समीरचे वडीलही हिंदू असून त्यांनी मुस्लीम महिलेशी लग्न केलं होतं. माझ्या सासुबाई आज हयात नाहीत. समीरचं आधीचं लग्न विशेष विवाह कायद्याअंतर्गत झालं होतं. त्याने २०१६ मध्ये घटस्फोट घेतला आहे.आम्ही हिंदू विवाह कायद्यानुसार २०१७ साली लग्न केलं आहे” असं उत्तर दिलं आहे. एकमेकांना वरमाला घालताना आणि नंतर आपल्या पालकांच्या साक्षीने मंदिरामध्ये विवाह करतानाचे दोन फोटो क्रांतीने पोस्ट केले आहेत.

२००६ साली विशेष विवाह कायदा १९५४ अंतर्गत समीवर वानखेडे यांनी डॉ. शबाना कुरेशी यांच्याशी लग्न केल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.२०१६ मध्ये विशेष विवाह कायद्याअंतर्गत समीर आणि शबाना या दोघांनी दिवाणी घटस्फोट घेतला. २०१७ मध्ये समीर यांनी क्रांती रेडकरशी विवाह केला, असंही समीर म्हणाले आहेत.

समीर वानखेडे यांचा एक जुना फोटो नवाब मलिक यांनी ट्वीटरवर शेअर केल्याने या प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. आता वानखेडेंनीही यावर स्पष्टीकरण दिलंय. ते म्हणतात “माझे वडील ज्ञानदेव कचरुजी वानखेडे ३० जून २००७ रोजी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पुणे येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून निवृत्त झाले आहेत. माझे वडील हिंदू आणि माझी आई स्वर्गीय श्रीमती झहीदा मुस्लिम होत्या. मी भारतीय परंपरेतील एक संमिश्र, बहुधर्मीय आणि धर्मनिरपेक्ष कुटुंबातील असुन आणि मला माझ्या वारशाचा अभिमान आहे.”

Advertisements

Related Stories

सदाभाऊ खोत यांना कोरोनाची बाधा

Rohan_P

मुंबई पोलीस दलामध्ये कोरोनाचा आठवा बळी!

Rohan_P

राजस्थान-हैद्राबाद आज चुरशीचा सामना

Patil_p

राज्यात कोरोना रुग्णसंख्येत घट, आज ४,७८० कोरोनामुक्त

Abhijeet Shinde

प्रशांत किशोर यांच्या काँग्रेस प्रवेशावरुन पक्षात फूट?; सोनिया गांधी घेणार निर्णय

Abhijeet Shinde

”भाजपा नेत्यांना खराब रस्त्याने प्रवास करण्यास भाग पाडणारे आंदोलक कौतुकास पात्र”

Sumit Tambekar
error: Content is protected !!