तरुण भारत

पाकिस्तान नव्हे काश्मिरींशी चर्चा करू!

केंद्रीय गृहमंत्र्यांनी अब्दुल्लांना सुनावले – मनातून भय काढून, टाका ः बुलेटप्रूफशिवाय येथे आलोय

वृत्तसंस्था/ श्रीनगर

Advertisements

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱयातील अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी श्ा़खाrनगरमध्ये आयोजित जाहीर सभेला संबोधित केले आहे. काश्मीरमधील लोकांनी खूप काही सहन केले आहे. काश्मीरमधील तरुणाईशी मैत्री करण्याची माझी इच्छा आहे, याचमुळे बुलेटप्रूफशिवाय लोकांमध्ये आलो आहे. मनातून भय काढून टाका असे आवाहन करत शाह यांनी पाकिस्तानऐवजी खोऱयातील लोकांशी चर्चा करू असे उद्गार काढले आहेत.

काश्मीरवर जितका माझा अधिकार आहे, तितकाच काश्मिरींचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हृदयात काश्मीरला स्थान प्राप्त आहे. काश्मीरच्या लोकांना समान अधिकार मिळावा याकरता आमच्या सरकारने सर्व आवश्यक पावले उचलली आहेत. फारुख अब्दुल्ला यांनी भारत सरकारला पाकिस्तानशी चर्चा करण्याचा सल्ला दिला, परंतु मी खोऱयातील तरुणाईसोबत बोलू इच्छितो. काश्मीर खोरे, जम्मू आणि लडाखच्या विकासाच्या मार्गात आता कुणीच अडथळे आणू शकत नाहीत, असे शाह म्हणाले.

कलम 370 रद्द झाल्यावर…

कलम 370 हद्दपार करण्यात आल्यावर काश्मीर खोऱयातील लोकांची जमीन हिसकाविली जाईल असे काही जणांनी म्हटले होते. पण असे आरोप करणारे लोक येथील विकास रोखून ठेवू इच्छितात. स्वतःची सत्ता वाचवू पाहत आहेत, 70 वर्षांपासून चालविलेला भ्रष्टाचार सुरू ठेवू इच्छित असल्याचे म्हणत शाह यांनी अब्दुल्ला, मुफ्ती परिवार तसेच काँग्रेसला लक्ष्य केले आहे. मागील 70 वर्षांपासून काश्मिरी लोकांना अधिकारांपासून वंचित ठेवण्यात आले. काश्मीरच्या तरुणांनी दगड उचलू नये अशी आमची इच्छा आहे. काश्मीरला स्वतःचा मुख्यमंत्री असावा, जो लंडनला जाणारा नसावा असेही त्यांनी म्हटले आहे.

खीर भवानी मंदिरात पूजा

तत्पूर्वी अमित शाह यांनी सोमवारी जम्मू-काश्मीरच्या गंदेरबल जिल्हय़ात खीर भवानी मंदिरात पूजा केली. गृहमंत्री सोमवारी पहाटे मध्य काश्मीर जिल्हय़ाच्या तुल्लामुल्ला भागात चिनारच्या वृक्षांनी घेरलेल्या मंदिर परिसरात पोहोचले. पारंपरिक काश्मिरी फिरन परिधान केलेल्या शाह यांनी माता रागन्या देवीच्या मंदिरात दर्शन घेतले आहे. यावेळी त्यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील होते.

3 दिवसांचा दौरा

गृहमंत्री शाह शनिवारी जम्मू-काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱयावर श्रीनगर पोहोचले होते. श्रीनगरमध्ये पोहोचताच त्यांनी हुतात्मा पोलीस अधिकारी परवेज अहमद यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. अहमद हे जून महिन्यात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात हुतात्मा झाले आहेत. त्याचदिवशी शाह यांनी राजभवनात झालेल्या एका बैठकीत सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. तसेच खोऱयात नव्याने स्थापन युवा क्लबच्या सदस्यांसोबत संवाद साधला होता. शाह यांनी रविवारी जम्मूचा दौरा करत तेथील जाहीर सभेला संबोधित केले होते.

सीमेवर राहणाऱया दिला नंबर

गृहमंत्री शाह हे रविवारी सीमेला लागून असलेल्या एका गावात पोहोचले होते. शाह यांनी यावेळी अनेक स्थानिक नागरिकांशी संवाद साधला. गावातील एका घरात पोहोचलेले शाह यांनी ग्रामस्थाला स्वतःचा मोबाईल क्रमांक देत कधीच संपर्क साधू शकता असे सांगितले आहे.

Related Stories

बंगालच्या दोन खासदारांना वाय प्लस सुरक्षा

Patil_p

टीव्हीच्या किमती पुन्हा वाढणार?

Patil_p

इराणमध्ये अडकलेले 234 भारतीय मायदेशी परतले

tarunbharat

पेट्रोल ‘शंभरी’कडे!

Patil_p

झोपडपट्टीमध्ये शिरला ट्रक, 8 जणांचा मृत्यू

Patil_p

दिलासादायक : महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 12,326 रुग्ण कोरोनामुक्त; रिकव्हरी रेट 65.37 टक्के

Rohan_P
error: Content is protected !!