तरुण भारत

वायसीएम` पीएचडी’प्राध्यापक पदासाठी ग्राह्य धरण्यास मान्यता

प्रतिनिधी / कोल्हापूर

शिवाजी विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक पदासाठी सेट-नेट आणि पीएच. डी. पदवी पूर्ण असावी, अशी अट घालण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या पाच वर्षात काहींनी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. ही पीएच. डी. पदवी ग्राह्य धरायची की नाही, यावर विद्या परिषदेच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. चर्चेअंती मुक्त विद्यापीठाची पीएच. डी. पदवी ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे संबंधीत प्राध्यापकांना दिलासा मिळाला आहे. कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के अध्यक्षस्थानी असलेल्या बैठकीत 57 विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

Advertisements

शिवाजी विद्यापीठ विद्या परिषदेच्या बैठकीत नवीन प्लंबिंग डिप्लोमा कोर्स सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. एलआयसी अंतर्गत विविध अभ्यासक्रमांना मान्यता देणे, एखाद्या विषयाची मान्यता काढून घेतली तर काय करायचे. यासंदर्भात चर्चा करून निर्णय घेण्यात आला. विद्यापीठाने विविध पदासाठी जाहीरात देवून अर्ज मागवले आहेत, या पदांच्या मुलाखती घेवून जागा भरण्यासंदर्भात कुलगुरू डॉ. शिर्के यांनी विद्या परिषदेला माहिती दिली. तसेच दूरशिक्षण अंतर्गत एम. बी. ए., बी. एस्सी., एम. एस्सी. विषय पाच वर्षासाठी सुरू करण्यास मान्यता देण्यात आली.

मराठी विभागांतर्गत चित्रपट प्रमाणपत्र अभ्यासक्रम, संगीत व नाटÎशास्त्र विभागांतर्गत भजन प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच वादवानी फौंडेशनबरोबर केलेल्या सामंजस्य करारांतर्गत कौशल्य विकास अभ्यासक्रम सुरू करण्यास मान्यता देण्यात आली. जत येथील राजे रामराव महाविद्यालयाला एम. फिल., पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी मान्यता देण्यात आली. राजारामबापू इन्स्टिटÎूट ऑफ टेक्नॉलॉजीला पीएच. डी. अभ्यासक्रमासाठी मान्यता देण्यात आली. यासह विविध 57 विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीला प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर यांच्यासह विद्यापरिषदेचे सर्व सदस्य उपस्थित होते.

स्वायत्तता प्रस्ताव पुढील अधिकार मंडळासमोर

शिवाजी विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र, पदार्थविज्ञानशास्त्र, प्राणीशास्त्र आणि अर्थशास्त्र विभागाचा स्वायत्तता प्रस्ताव पुढील अधिकार मंडळासमोर ठेवण्यात मान्यता देण्यात आली. त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात या अभ्यासक्रमांना स्वायत्तता मिळणार आहे.

Related Stories

सांगलीवाडीत नागरी वस्तीत शिरलेली अजस्त्र मगर पकडली

Abhijeet Shinde

आता पोलिसांची कानडी परेड; कर्नाटक सरकारचा महत्वाचा निर्णय

Abhijeet Shinde

इचलकरंजीत तेरा दिवसांत ६० पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

वॉर रूम…माणसं मारायला केलीय काय?

Abhijeet Shinde

कोल्हापूर शहरात १० ठिकाणी मोफत स्वॅब तपासणी

Abhijeet Shinde

कोल्हापूर : अब्दुललाट येथे ग्रामपंचायतीच्या दारातच लावला कचऱ्याचा ढीग

Abhijeet Shinde
error: Content is protected !!