तरुण भारत

संजित, सचिन कुमार यांना पहिल्या फेरीत पुढे चाल

वृत्तसंस्था/ बेलग्रेड

येथे सुरू होणाऱया पुरूषांच्या विश्व मुष्टीयुद्ध स्पर्धेतील काढण्यात आलेल्या ड्रॉ मध्ये भारताचे संजित आणि सचिन कुमार यांना त्यांच्या वजनगटात पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.

Advertisements

ही स्पर्धा विविध दहा वजनगटामध्ये घेतली जाणार आहे. 92 किलो वजनगटात भारताचा आशियाई स्पर्धेतील विजेता संजित याचा दुसऱया फेरीतील सामना रशियाच्या स्टोसेकीविरुद्ध शुक्रवारी होणार आहे.

80 किलो वजनगटातील सचिनकुमारचा दुसऱया फेरीतील सामना अमेरिकेच्या गोंझालेझविरुद्ध शनिवारी खेळविला जाणार आहे. या स्पर्धेमध्ये 100 देशांचे सुमारे 600 स्पर्धक सहभागी झाले आहेत. उपांत्यपूर्व फेरीचा टप्पा गाठण्यासाठी मुष्टियोद्धय़ांना किमान तीन लढती जिंकाव्या लागतील. सचिनकुमारचे या स्पर्धेत यावेळी पदार्पण होत आहे.

63.5 किलो वजनगटात आतापर्यंत पाचवेळा आशियाई पदक मिळविणारा शिवा थापाचा सलामीचा सामना मंगळवारी केनियाच्या निडेराशी होणार आहे. 51 किलो वजनगटात आशियाई स्पर्धेतील रौप्यपदक विजेता दीपककुमार याने गेल्यावर्षी झालेल्या स्ट्रेंजा स्मृती आंतरराष्ट्रीय स्पर्धेत रौप्यपदक मिळविले होते. त्याचा सलामीचा सामना मंगळवारी किर्जीस्तानच्या युसेनालिव्हशी होणार आहे. 54 किलो वजनगटात आकाशकुमारचा सलामीचा सामना शुक्रवारी जर्मनीच्या सेलाहशी होणार आहे.

भारताचा रोहित मोर 57 किलो वजनगटात खेळणार असून त्याचा पहिल्या फेरीतील सामना इक्वेडोरचा कॅसेडोशी तसेच 67 किलो वजनगटात भारताच्या आकाशचा सलामीचा सामना तुर्कीच्या ऍडेमशी होणार आहे. या स्पर्धेत बुधवारी 60 किलो वजनगटात भारताच्या वरिंदर सिंगचा सलामीचा सामना अर्मेनियाच्या टोनाकेनयानशी तर 71 किलो वजनगटात निशात देवचा सलामीचा सामना हंगेरीच्या कोझेशी होणार आहे. 86 किलो वजनगटात लक्ष चहरचा सलामीचा सामना कोरियाच्या किमविरुद्ध होणार आहे. 92 किलोवरील वजनगटात भारताच्या नरेंद्रचा सामना मंगळवारी पोलंडच्या सेफरयानशी होईल.

या स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी एक लाख डॉलर्स, रौप्यपदक विजेत्याला 50 हजार डॉलर्स तर कास्यपदक मिळविणाऱया दोन्ही स्पर्धकांना प्रत्येकी 25 हजार डॉलर्सचे बक्षीस देण्यात येईल. या स्पर्धेसाठी एकूण 2.6 दशलक्ष डॉलर्सची रक्कम ठेवण्यात आली आहे. भारतीय  मुष्टद्युद्ध संघाला प्रमुख प्रशिक्षक नरेंद्र राणा तसेच सहायक प्रशिक्षक एल. देवेंद्रो सिंग यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

Related Stories

बेंगळूर एफसीचा प्लेऑफ सामना 11 मे रोजी

Patil_p

अर्सेनलच्या साकाचा प्रिमियर लीगमधील पहिला गोल

Patil_p

नदाल, जोकोविच यांचे विजय

Amit Kulkarni

अँडी मरेचा पराभव

Patil_p

सॅमसन-केएल राहुल यांची जुगलबंदी रंगण्याची अपेक्षा

Patil_p

विश्व टेटे संघटनेचे कर्मचारी स्वतःहून कमी वेतन घेणार

Patil_p
error: Content is protected !!