तरुण भारत

मडगाव पालिकेच्या प्रभाग 25 मध्ये डेंग्यू, मलेरियासंदर्भात जनजागृती

नगरसेविका बबिता नाईक यांच्या पुढाकाराने मोहीम

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

मडगाव पालिकेच्या प्रभाग 25 च्या नगरसेविका बबिता सदानंद नाईक यांनी मडगाव आरोग्य केंद्राचे डॉक्टर तसेच कर्मचारी यांच्यासह डेंग्यू, मलेरियासारख्या रोगांविषयी जनजागृती हाती घेताना यासंदर्भात प्रभागातील रहिवाशांना पत्रके वाटली व डांस पैदास होणार नाही, यासाठी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन केले.

या मोहिमेत, परिसरात पाणी साचून राहणार नाही याची काळजी घ्यावी व पाणी साचून राहू शकते अशा वस्तू उघडय़ावर टाकू नयेत, असे आवाहन नाईक यांनी केले. पाणी साचून राहणाऱया वस्तूंमध्ये डास अंडी घालतात व त्यामुळे डासांची पैदास वाढून मलेरिया व डेंग्यूचा प्रसार होतो, याकडे आपण रहिवाशांचे लक्ष वेधले, अशी माहिती त्यांनी दिली. घर तसेच परिसरात स्वच्छता राखण्याचा महत्त्वाचा संदेश देण्यासाठी पुढाकार घेतल्याबद्दल नगरसेविका नाईक यांचे येथील रहिवाशांनी आभार मानले.

आरोग्य विभागातील डॉक्टर, वरिष्ठ निरीक्षक तसेच अन्य कर्मचारी यावेळी उपस्थित होते. त्यांनी रहिवाशांना योग्य मार्गदर्शन केले. गृहनिर्माण वसाहत समाविष्ट होत असलेल्या आपल्या प्रभागात वेळोवेळी साफसफाई करण्यात येते तसेच फॉगिंग यंत्राद्वारे डासांची पैदास थांबविण्यासाठी औषधांची फवारणी करण्याची मोहिमही राबविण्यात येते, अशी माहिती नाईक यांनी दिली.

Related Stories

सिद्धु केरकर, हर्षदा शेटगावकर यांना ‘गोमंत समाजसेविका’ पुरस्कार

Amit Kulkarni

‘इफ्फी’त पुढील वर्षी खासगी क्षेत्रालाही स्थान

Abhijeet Shinde

आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांचे दिल्ली, मुंबईत अनेक स्तरांवर प्रयत्न

Omkar B

राज्यात 15 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता

Amit Kulkarni

वाहतुकमंत्री माविन गुदिन्हो यांचा वाढदिवस साजरा

Amit Kulkarni

मुख्यमंत्र्यांनी दिल्लीत घेतल्या अनेक केंद्रिय मंत्र्यांच्या भेटी

Patil_p
error: Content is protected !!