तरुण भारत

रेखा पौडवाल यांनी साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त

प्रतिनिधी /पणजी

गोमंतकीय प्रसिद्ध लेखिका रेखा पौडवाल यांना वाशिम(महाराष्ट्र) येथील रंगीन काव्यधारा संचलित तेजभूषण बहुद्देशीय सामाजिक विकास संस्थेचा साहित्य गौरव पुरस्कार जाहीर झाला आहे. रेखा पौडवाल यांच्या स्मृतिगंध ललित लेख संग्रहाला साहित्य गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

Advertisements

 रेखा पौडवाल यांची आतापर्यंत 8 पुस्तके प्रकाशित झाली असून त्यात कवडसे, हिंदोळा, लपंडाव, दर्पण व स्मृतिगंध हे ललित लेख संग्रह, अंतर्भाव व भावस्पंदन हे कथा संग्रह व स्पर्श या काव्यसंग्रहाचा समावेश आहे. बहरल्या शब्दकळा हे त्यांचे पुस्तक प्रकाशनाच्या मार्गावर आहे.

  रेखा पौडवाल यांना सोलापूर येथील गांधी वाङ्मय पुरस्कार(2003), गोवा राज्य महिला व बालकल्याण खात्याचा यशोदामिनी पुरस्कार(2007), अमरावती येथील माय मराठी साहित्य व संस्कृती प्रति÷ान आणि अंकुर साहित्य संघाचा साहित्य गौरव पुरस्कार(2012), राष्ट्रीय सेवारत्न पुरस्कार व कला साधना कुडचडेचा महिला कला गौरव(2017) असे पुरस्कार प्राप्त झाले आहेत. याशिवाय गोव्यातील विविध वर्तमानपत्रातून व नियतकालिकेतून  सातत्याने  लेखन प्रसिद्ध झाले आहे. दूरदर्शन व आकाशवाणीवर त्यांनी कविता वाचन सादर केले आहे. याशिवाय अनेक कथा कविता स्पर्धांमध्ये पारितोषिक त्यांना प्राप्त झाले आहेत.

Related Stories

खासगी हॉस्पिटलांकडून कोरोनाबाधितांची आर्थिक फसवणूक

Patil_p

महामार्ग समस्यांप्रकरणी मंत्री आजगावकरांकडून अधिकारी धारेवर

Amit Kulkarni

फलोत्पादन मंडळाकडून केळावडेतून मोठय़ा प्रमाणात भाजीची उचल

Omkar B

लवकरच लोकशाहीचा उत्सव

Amit Kulkarni

माशेल चिमुलवाडा येथील सरकारी प्राथमिक शाळेला कपाट व पुस्तके

Amit Kulkarni

काँग्रेस प्रभारी दिनेश राव यांची उद्या काणकोणला भेट

Amit Kulkarni
error: Content is protected !!