तरुण भारत

म्हापसा पार्किंग प्रश्नी विरोधक आक्रमक

नगराध्यक्षा धारेवर : सत्ताधारी नगरसेवकांचे मौनव्रत

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

म्हापसा नगरपालिकेची सर्वसाधारण पालिका बैठक 3 महिन्याच्या कालावधीनंतर नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. म्हापसा परिसरात पार्किंग प्रकल्प उभारावा या प्रश्नावरून म्हापसेकारांचो एकवट ते विरोधक नगरसेवकांनी नगराध्यक्षांना सळो की पळो करून सोडले. या बैठकीत आमदार जौशुआ डिसोझा उपस्थित होते. विरोधकांचा अवतार पाहून त्यांनी या बैठकीत भ्रही काढला नाही.

नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष वगळता सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी मौन धारण करणेच पसंत केले. पूर्वी सांगितल्याप्रमाणे विकास, विकास आणि विकासासाठीच आम्ही भांडतो आहोत अशी माहिती विरोधकांनी यावेळी दिली. आगामी निवडणुका जवळ आल्याचे पाहून नगरसेवक सुधीर कांदोळकर प्रश्न उपस्थित करतात असा आरोप सत्ताधारी गटातील नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर व नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी केला असता नगरसेवक ऍड. शशांक नार्वेकर यांनी आक्षेप घेत ते शब्द मागे घ्यावे व माफी मागावी असे नगराध्यक्षांना सांगितले. आजच्या बैठकीत विरोधकांनी नगराध्यक्षांना फैलावर घेतले. पार्किंग प्रश्नी आजची बैठक बरीच गाजली.

पार्किंगची आजची वस्तूस्थिती दाखवा

पालिकेला किती महसूल येतो ते आम्हाला दाखवा अशी मागणी सुधीर कांदोळकर यांनी केली. नगरसेवक डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या, किती महसूल येतो, पूर्वी किती येत होता, पूर्वी कसा महसूल गोळा होत होता, कुणीतरी घेतले असे न करता आज पार्किंगची आमची समस्या कायम आहे हे आम्हाला सांगा. नगराध्यक्षानी आम्हाला समजून सांगावे असे डॉ. म्हणाल्या. कमल डिसोझा म्हणाल्या, सोपो धारकांकडे ऍग्रीमेंट नाही ते पाहिजे तशी वसूली करतात.

निवडणुकीमुळे प्रश्न उपस्थित करतात माफी मागा

हे निवडणुकीसाठी आवाज करतात हे म्हणणे चुकीचे आहे. प्रथम सुधीरची माफी मागा अशी मागणी नगरसेवक ऍड. शशांक नार्वेकर यांनी केली. आता 3 महिन्यानी बैठक घेतली आहे, मग आम्ही प्रश्न उपस्थित करणारच. मग ही बैठक निवडणुकीसाठी असून निवडणूक जवळ आल्याने प्रश्न उपस्थित केले म्हणणे चुकीचे आहे. असे ऍड. नार्वेकर म्हणाले. शेवटच्या पाच वर्षात काय झाले ते पुन्हा पुन्हा उपस्थित करू नका असे ते म्हणाले.

पार्किंग आराखडय़ाचे नियोजन करा

शेखर बेनकर म्हणाले की, पार्किंग प्रकल्प करावा की नाही यासाठी हे आम्ही पालिकेत आणले आहे. यात किती गाडय़ा बसतात मोटारसायकल आदी याविषयी चर्चा करू. अशी मागणी ऍड. शशांक नार्वेकर, सुधीर कांदोळकर यांनी केली. कांदोळकर म्हणाले की, हा प्रपोजल आणला तो चुकीचा आहे. पूर्वी सर्व माहिती जाणून घ्या. पूर्वनियोजित आराखडा करून आणा. म्हापशात संपूर्ण पार्किंग नियोजितरीत्या करूया असे सुधीर कांदोळकरांनी सांगितले. लोकांची आम्ही योग्य सोय करूया.

पांढरे हत्ती प्रकल्प आम्हाला नको

जुन्या बसस्थानकाकडे पार्किंग जास्त झाले आहे. बसस्थानक पुढे न्यायला हवे. आम्हाला पांढरे हत्ती प्रकल्प नको. मोठे प्रकल्प येऊन फक्त 20 ते 10 रुपये गोळा करणारा प्रकल्प आम्हाला नको. असे ऍड. शशांक नार्वेकर म्हणाले. पार्किंग प्रकल्पासाठी खास बैठक बोलवा. 24 तासात सर्वकाही मंजूर करू असे सुधीर कांदोळकर म्हणाले. विकास विकास विकास आम्ही म्हापशात करुया असे म्हणून विरोधी गटातील नगरसेवक सुधीर कांदोळकर ऍड. शशांक नार्वेकर, कमल डिसोझा, डॉ. नूतन बिचोलकर, अन्वी कोरगांवकर, तारक आरोलकर यांनी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांना बरेच धारेवर धरले.

चार कर्मचाऱयांना कमी करण्यावरून वाद

चार कर्मचाऱयांना कामावरून काढावे की नाही याबाबत बरीच चर्चा झाली. विरोधकांनी त्यांना ठेवावे अशी मागणी केली. नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकरांनी दोघांना ठेवा दोघांना कमी करू असे म्हटले. नंतर प्रकाश भिवशेटनीही हे प्रकरण उचलून धरीत दोघांना कमी करावे अशी मागणी केली. अन्य कामाची गरज नाही असे सूचित केले यावर बरीच चर्चा झाली.

पार्किंग धारक 5 रुपये घेऊन किती महसूल गोळा करतो

म्हापसा बाजारपेठेत आतमझ्ये जाताना सोपो धारक 5 रुपये घेऊन आतमध्ये सोडतो. नेमके किती जणांना सोडतात हे स्पष्ट करावे अशी मागणी कांदोळकर यांनी केली. हजारो गाडय़ा आतमध्ये जातात. मार्केट कमिटीची बैठक कधी झाली आम्हाला काहीच सांगितले नाही. असे नगरसेविका अन्वी कोरगांवकर म्हणाल्या. पाच रुपयाची समस्या पूर्वीच्या पालिका मंडळात होती तेव्हा हा प्रश्न का उद्भवला नाही. असा प्रश्न नगरसेवक साईनाथ राऊळ यांनी उपस्थित केला. आम्हाला ऍग्रीमेंट दाखवा. पालिकेला किती महसूल येतो ते दाखवा अशी मागणी नगरसेवक सुधीर कांदोळकर यांनी केली.

आगामी निवडणुकीमुळेच विरोधकांचा आटापीटा- नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर

कोविडमुळे अर्धे आरक्षण भरतो अर्धे पैसे माफ करा असे पार्किंग धारकांनी पालिकेला लेखी सांगितले होते. हे पालिकेला सादर करावे होते. ज्या प्रमाणे आम्ही ठरविले ते पुढे नेणार आम्ही बेकायदेशीर काही केले नाही. जी कामे आहे ती 3 महिन्यात 19 नगरसेवकांना बरोबरीने घेऊन पुढे जाणार. आम्ही विरोधकांची कामे जास्त केली येथे तसे काहीच नाही. हा त्यांचा भ्रम आणि येणारी निवडणुका म्हणूनत आटापीटा असे नगराध्यक्षा शुभांगी वायंगणकर आपली प्रतिक्रिया देताना म्हणाल्या.

पालिका कर्मचाऱयांकडे दुर्लक्ष- डॉ. नूतन बिचोलकर

एका बाजूने पालिकेत कामे होत नाही असे म्हणतात दुसऱया बाजूनी कर्मचाऱयांना घरी पाठवू पाहतात हे कसे काय म्हणतात असा सवाल आपली प्रतिक्रिया देताना डॉ. नूतन बिचोलकर म्हणाल्या. रोजगार पाहिजे. कर्मचाऱयांवर कोणाचा दबाव नाही. दुपारपर्यंत कर्मतारी घरी जातात याकडे नगराध्यक्षांचे लक्ष नाही असे त्या म्हणाल्या. लेखापालाला आमचा ठराव पहायला वेळ नाही. गणेशपुरीत वयोवृद्ध आहेत त्यांच्या घरात पाणी येते, गटार स्वच्छ केले, आमगार आले मात्र काहीच करीत नाही. आम्हाला यातून सुटावा कधी होणार. काहींची जाणून बुजून सतावणूक केली जाते असा आरोप बिचोलकर यांनी केला. डांगी कॉलनीत पायवाटकडेही दुर्लक्ष केले जाते.

नगराध्यक्षांनी राजिनामा द्यावा- ऍड. शशांक नार्वेकर

अजेंडा घेतला त्यात ठराव बरोबर नाही. निविदा नाही. हे करीत असताना 3 महिन्याक बैठक घेतली आहे. प्रत्येक 2 महिन्यात बैठक घ्यायला पाहिजे. बेकायदेशीर ठराव नगराध्यक्षा घेतात. मुख्याधिकारी पालिकेसमोर आणा असे लेखी देतो. बैठकच चुकीची बोलावतात. सर्व ठराव चुकीचे आणले आहे. असे नगरसेवक शशांक नार्वेकर म्हणाले. नगराध्यक्षांनी राजिनामा द्यावा येथे अनेकजण खुर्ची सांभाळण्यात आहेत.

यापूर्वीचा आमदार मुख्याधिकारी जबाबदार- कमल डिसोझा

नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकर यांनी बाजारपेठेत जाऊन पार्किंग पहावे. मुख्याधिकाऱयांना करार करायला जमत नसल्यास त्यांनी घरी बसावे. पार्किंग कुठेही कशाही पद्धतीने मारतात. उद्या तेच पालिकेवर केस करणार. पार्किंगवाला अंडरटेबल पैसे घेतात. याला पूर्वीचा आमदार व मुख्याधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नगरसेविका कमल डिसोझा यांनी केला.

बैठकीत गदारोळ सुरू असताना विरोधक आक्रमक झाल्याचे पाहून आमदार जोशुआ डिसोझा यांनी नगराध्यक्ष शुभांगी वायंगणकरांना समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र त्या ऐकण्याच्या परिस्थितीत नव्हत्या. यात आमदार संतप्त झाले. आणि बैठक संपण्याच्या आधीच त्यांनी बैठकीतून काढता पाय घेतला.

Related Stories

राज्यातील 20 हजार उद्योगांना कर्ज मिळणार

Omkar B

कोरोनाचे संकट अजूनही कायम

Amit Kulkarni

‘त्या’ जखमी युवकाचा मृत्यू

Amit Kulkarni

‘म्हादई’च्या बचावासाठी सांस्कृतिक संस्थांनी पुढे यावे

Patil_p

माजी आरोग्यमंत्री डॉ. सुरेश आमोणकर यांचे निधन

Patil_p

मये मतदारंघात येणाऱया काळात 209 कोटींची विकासकामे

Omkar B
error: Content is protected !!