तरुण भारत

शस्त्र तस्करीच्या विळख्यात तरूणाई

नऊ महिन्यांत 8 पिस्तुल, 2, प्रत्येकी 2 रिव्हॉल्व्हर, बंदुका जप्त

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

भागात आपला वट, दहशत माजवण्यासाठी पूर्वी फाळकुटदादांकडून तलवार, चाकू, फायटरचा वापर सर्रास होत होता. मात्र आता गावठी कट्टा, पिस्तुल सहज उपलब्ध झाल्याने खेळण्यातील बंदुकीप्रमाणेच कोल्हापुरात बंदूक, रिव्हॉल्व्हर आढळत आहेत. गेल्या काही दिवसांत पोलिसांनी केलेल्या विविध कारवायांतून ही बाब समोर आली आहे. शस्त्रतस्करीच्या रॅकेटमध्ये तरुणाई मोठ्या प्रमाणात गुरफटली आहे.

तलवार, चाकू, सत्तूर आणि फायटरचा वापर काळाच्या ओघात मागे पडला. आता भागात दहशत माजवण्यासाठी सर्रास बंदुकी, छोट्या पिस्तुलचा वापर केला जात आहे. गेल्या वर्षभरात पोलिसांनी बंदुका, पिस्तुलशी निगडीत केलेल्या कारवायामधून ही बाब स्पष्ट झाली आहे. गेल्या 9 महिन्यांत 8 पिस्तूल, 2 रिव्हॉल्वर, 2 बंदूक जप्त केल्या आहेत. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत, शहरात महापालिका निवडणूक होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. सध्या शाळा, महाविद्यालयेही सुरू झाली आहेत. त्यातूनच कॉलेज वॉरही वाढण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणेकडून अवैध बंदुका, पिस्तुल, अन्य शस्त्रांचा शोध घेण्यासाठी मोठया प्रमाणात मोहीम राबवली जात आहे.

परवानाधारक
जिह्यातील शस्त्र परवानाधारक: 7500
स्पोर्ट्स रायफल: 150
शेती संरक्षणाची शस्त्र: 400

गेल्या काही दिवसांत आढळलेली पिस्तुल
कबनूर : गावठी पिस्तूल, 1 जिवंत राउंड
सानेगुरुजी वसाहत : गावठी पिस्तुल 2 जिवंत राउंड
टिंबर मार्केट : गावठी पिस्तुल 3 जिवंत राउंड
शेंडा पार्क : गावठी पिस्तूल, 2 जिवंत राउंड
चुये फाटा : पिस्तुल


दसरा चौक : गावठी पिस्तूल, 1 जिवंत राउंड
गेल्या 3 वर्षात कारवाईतून जप्त केलेली शस्त्रs
2018: पिस्तुल 17
2019: पिस्तुल 11 रिव्हॉल्वर 5
2020: पिस्तूल 5 रिव्हॉल्वर 2
सप्टेंबर 2021: पिस्तूल 8, रिव्हॉल्वर 2, बंदूक 2


मध्यप्रदेश, उत्तरप्रदेशमार्गे ट्रकमधून कोल्हापुरात

कोल्हापूरसह इचलकरंजी परिसरात यापूर्वी शस्त्र तस्करीच्या उलाढाली होत होत्या, आता तस्करीचे जाळे ग्रामीण भागापर्यंत पोहोचले आहे. अनेक शस्त्र तस्करीच्या गुह्यांमध्ये तरुण अडकले आहेत. जिह्यातील काही तस्करांचे थेट कनेक्शन मध्य प्रदेश, बिहारसह राजस्थान राज्यात असल्याचे समोर आले आहे. पिस्तूल, रिव्हॉल्वर, बंदुकीची तस्करी ट्रक, मालवाहतूक गाड्यांमधून होते. काही वेळा शस्त्रतस्कर स्वतः दुचाकीवरुन त्याची तस्करी करतात. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थानातून बांधकाम व्यवसायासाठी येणारे कामगारही या शस्त्र तस्करीच्या रॅकेटमध्ये सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शस्त्रतस्करीबाबत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या आहेत. जिह्यामध्ये पिस्तुल, रिव्हॉल्वर, आणि बंदूक सापडण्याच्या घटना वाढल्या आहेत. शस्त्र तस्करांवर पोलिसांची बारीक नजर असून त्यांच्यावर कारवाईचे काम सुरु आहे.
पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, स्थानिक गुन्हे अन्वेषण

महापालिका निवडणूक डोळ्यासमोर
गेल्या काही दिवसांपासून जिह्यातील खून, मारामाऱया, वादावादीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्याला काही ठिकाणी महापालिका निवडणुकीची किनार आहे. महापालिका निवडणुकांच्या काळात या वादामध्ये भर पडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलीस यंत्रणेकडून तस्करांच्या मुसक्या आवळण्याचे काम सुरु आहे.

खरेदीदारापर्यंत पोहोचण्याचे आव्हान
पोलिसांनी 9 महिन्यांत 10 हत्यारे जप्त केली. एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्र शहरात कोणासाठी आणली होती. याचे खरेदीदार कोण, याचा शोध घेण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. तसेच याचा वापर कशासाठी करण्यात येणार होता हे शोधणे गरजेचे आहे.

Related Stories

कोल्हापूर : काळाम्मावाडी धरण ७६.४१ टक्के भरले, दुधगंगा नदीचे पाणी पात्राबाहेर

Abhijeet Shinde

गोशिमाच्या अध्यक्षपदी मोहन पंडितराव

Abhijeet Shinde

‘कबनूरच्या इनाम जमिनी रद्द कराव्यात’

Abhijeet Shinde

गोकुळच्या निविदा प्रक्रिया पारदर्शी करा

Abhijeet Shinde

कोल्हापूर : पावसाची उसंत,नद्यांच्या पाणीपातळीत घट

Abhijeet Shinde

कोल्हापूर : थेट पाईप लाईनच्या कामाला गती !

Abhijeet Shinde
error: Content is protected !!