तरुण भारत

गृहमंत्री अमित शहांनी पुलवामा CRPF कँपमध्ये केला मुक्काम

ऑनलाईन टीम/तरुण भारत

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जम्मू-काश्मीरच्या दौऱ्याच्या तिसऱ्या आणि शेवटच्या दिवशी सोमवारी पुलवामामधील केंद्रीय रिजर्व्ह पोलीस दल कँपमध्ये मुक्काम केला. यावेळी काल रात्री अमित शहा यांनी सीआरपीएफ कँपमध्ये थांबून जवानांसोबत जेवले. याबाबतची माहिती अमित शहा यांनी स्वतः ट्वीट करत सांगितली होती.

अमित शहा यांच्यासोबत जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा देखील सीआरपीएफ कँपमध्ये होते. अमित शहा यांनी पुलवामा येथे पोहोचल्यानंतर काश्मीरमधील दहशतवाद आणि दगडफेकीच्या घटनांवर आपले मत मांडले. ते म्हणाले की, ‘दहशतवाद्यांविरोधात मोदी सरकारचे झिरो टॉलरेंस नीती असून सर्वसामान्यांना वाचवणे हे आमचे प्राधान्य आहे.’ शिवाय शहा म्हणाले की, ‘पूर्वी कश्मिरमधून दगडफेकीच्या घटना खूप ऐकू येत असे. पण आजची परिस्थिती वेगळी आहे, ‘ असे ते म्हणाले.

Advertisements

Related Stories

जम्मू-काश्मीर : सीमाभागात ड्रोनच्या मदतीने टाकण्यात आलेली शस्त्रास्त्रे जप्त

datta jadhav

बिहार-झारखंडचे माजी राज्यपाल राम जोइस यांचे निधन

Abhijeet Shinde

वॉर्डबॉयचा मृत्यू लसीमुळे नाही

Patil_p

निर्णय होईपर्यंत वीजतोडणी थांबवणार : अजित पवार यांची घोषणा

Rohan_P

भारतात 91 लाख रुग्णांची कोरोनावर मात

datta jadhav

व्हेल माशाची सव्वा तीन कोटी किंमतीची उलटी जप्त

Sumit Tambekar
error: Content is protected !!