तरुण भारत

कोल्हापूर जिल्हा नियोजन, जिल्हा परिषद सभा दिवाळीनंतरच

प्रतिनिधी / कोल्हापूर

जिल्हा नियोजन समितीची सभा 30 ऑक्टोबर रोजी निश्चित झाली होती. पण आता ही सभा दिवाळीनंतर म्हणजे 8 नोव्हेंबरला होणार आहे. त्यानंतर 12 नोव्हेंबरला जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होणार आहे. या दोन्ही सभांच्या पार्श्वभूमीवर जि.प.तील अधिकारी व कर्मचाऱयांची तयारी सुरु असून विधान परिषदेच्या आचारसंहितेपूर्वी सर्व विकासकामे मार्गी लावण्याची लगबग सुरु आहे.

जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा 12 नोव्हेंबर रोजी राजर्षी शाहू महाराज सभागृहात होणार आहे. राहूल पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी 1 वाजता सभा सुरु होईल. पंधराव वित्त आयोग, जनसुविधा, नागरी सुविधा या योजनांमधून 26 कोटी रूपयांचा आराखडा या सभेमध्ये मंजूर केला जाणार आहे. 15 व्या वित्त आयोगातील 10 कोटी 63 लाख रूपयांचा बंधित तर 3 कोटी 54 लाखांचा अबंधित निधीचा आराखडा या सभेत मांडून त्याला मंजुरी घेतली जाणार आहे.

नोव्हेंबर महिन्याच्या उत्तरार्धात विधान परिषद निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी विकास कामांना मंजूरी घेऊन ती मार्गी लावण्यासाठी जि.प. सदस्यांची धडपड सुरु आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर लगेच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीची लगबग सुरु होणार आहे. त्यामुळे येत्या 15 ते 20 दिवसांत विकासकामांची प्रशासकीय पुर्तता करण्यासाठी अधिकाऱयांची आणि सदस्यांची धावपळ सुरु आहे. जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषदेला किती निधी मिळणार याकडे सर्व जि.प.सदस्यांचे लक्ष आहे.

Advertisements

Related Stories

दुचाकीस्वाराची बॅरिकेटसला धडक, दुचाकीस्वाराचा मृत्यू

Abhijeet Shinde

पेठ वडगाव श्री महालक्ष्मी देवस्थान समितीचे अध्यक्ष दिलीपसिंह यादव यांचे निधन

Abhijeet Shinde

टोप येथील शेततळ्यात तरुण बुडाला

Abhijeet Shinde

शाहू कारखान्यातर्फे मॅटवरील कुस्ती स्पर्धांचे आयोजन

Abhijeet Shinde

कोल्हापूर : डी. जे. दबडेंना आदर्श कुशल नेतृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान

Abhijeet Shinde

कुरुंदवाडमध्ये ‘एनआरसी’विरोधात कडकडीत बंद

Abhijeet Shinde
error: Content is protected !!