तरुण भारत

पाणबुडय़ांची माहिती लीक, नौदलाच्या अधिकाऱयांना अटक

सीबीआयची कारवाई – नौदलाकडून उच्चस्तरीय चौकशीचे आदेश

वृत्तसंस्था  / नवी दिल्ली

Advertisements

सीबीआयने एक महत्त्वाचे पाऊल उचलत पाणबुडीच्या आधुनिकीकरणाशी संबंधित गोपनीय माहिती लीक केल्याप्रकरणी दोन सेवानिवृत्त अधिकाऱयांसह भारतीय नौदलाच्या एका अधिकाऱयाला अटक केली आहे. माहिती लीक करण्यात आल्याच्या घटनेप्रकरणी भारतीय नौदलाने देखील व्हाइस ऍडमिरल आणि रियर ऍडमिरल यांच्या अंतर्गत एका उच्चस्तरीय चौकशीचा आदेश दिला आहे.

संबंधित यंत्रणांकडून इनपूट प्राप्त करण्यात आल्यावर सीबीआयने कमांडर रँकच्या एका कार्यरत नौदल अधिकाऱयाला अटक केली. या अधिकाऱयाने सेवानिवृत्त अधिकाऱयांना किलो-क्लास पाणबुडी आधुनिकीकरण प्रकल्पाशी संबंधित माहिती दिली होती. हा अधिकारी सध्या मुंबईत तैनात आहे.

सीबीआय अनेक अन्य अधिकाऱयांचीही चौकशी करत आहे. हे अधिकारी अटकेतील अधिकाऱयांच्या संपर्कात होते. भारतीय नौदल सीबीआयला चौकशीत सहाय्य करत आहे. राष्ट्रीय सुरक्षेची देखभाल करणाऱया यंत्रणांसह सरकारच्या वरिष्ठ अधिकाऱयांनाही चौकशीच्या स्थितीची माहिती देण्यात आली आहे.

नौदलाच्या वरिष्ठ अधिकाऱयांना या प्रकरणाची माहिती देण्यात आल्यावर व्हाइस ऍडमिरल यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यीय पथकाची निर्मिती करण्यात आली आहे. या प्रकरणाची आता समांतर चौकशी सुरू करत नौदलातील कुठल्याही संभाव्य माहिती लीकला रोखण्यात आले आहे. तसेच भविष्यात माहिती लीक होण्याचे प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना सुचविण्यास सांगण्यात आले आहे. तपास यंत्रणा तिन्ही संरक्षण दलांच्या माजी अधिकाऱयांच्या हालचालींवर देखरेख ठेवत आहे, याचमुळे ही कारवाई शक्य झाली आहे. याप्रकरणी आणखी काही इनपूट मिळाले असल्याने अन्य काही जणांना अटक होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

Related Stories

तैवानकडून युद्धाच्या तयारीची घोषणा

Patil_p

उत्तरप्रदेशात भाजपला आणखी एक झटका

Patil_p

बस-ट्रकच्या धडकेत 10 जणांचा मृत्यू

Patil_p

देशात मागील 8 महिन्यातील निच्चांकी रुग्णवाढ

datta jadhav

लोअर आसामकडून काँग्रेसला अपेक्षा

Patil_p

देशात मागील 24 तासात 2.11 लाख नवीन कोरोना रुग्ण; 3,842 मृत्यू

Rohan_P
error: Content is protected !!