तरुण भारत

‘लस आपल्या दारी’ उपक्रम फलदायी

अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार 27 ऑक्टोबर 2021, सकाळी 10.00

● जिल्हा लसीकरणाच्या उच्चांकाकडे
● जिल्हा आरोग्य विभागाचे मिशन सक्सेस
● रूग्णवाढीचा दर घसरल्याने खरेेदीची लगबग
● जिल्ह्यात 24 तासात 68 नवे रूग्ण वाढले
● 3 हजार 550 संशयितांंच्या चाचण्या
● पॉझिटिव्हीटी रेेट 1.92 वर

Advertisements

सातारा / प्रतिनिधी :

जिल्ह्यात कोरोना रूग्णवाढीचा आलेख आणखी वेगाने घसरत आहे. त्यामुळे जिल्हावासियांंच्यात सुःखद वातावरण असून दिपावली उत्साह वाढण्याची चिन्हे आहेत. गेल्या वर्षी प्रत्येक सणांवर मर्यादा आल्या होत्या. मात्र, यंदा कोरोना रूग्णवाढीचा आलेख घसरल्याने जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरू झाली आहे. यातच दिपावली पाच दिवसांवर असतानाच ‘लस आपल्या दारी’ हा उपक्रम अनेक शहरात सुरू झाला आहे. त्यामुळे लसीकरणापासून वंचित राहिलेेल्या अनेकांना कोरोना प्रतिबंधात्मक लस उपलब्ध होणार आहे. दरम्यान गेल्या 24 तासात जिल्ह्यात 3 हजार 550 जणांच्या चाचण्या झाल्या असून 68 रूग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत.

गणेशोत्सव, ईद, नवरात्रीनंतर दिपावलीचा उत्साह

गेल्या वर्षात कोरोना संसर्गाच्या वाढत्या छायेत प्रत्येक सण साजरा करावा लागला होता. मात्र यंदा गणेशोत्सवाची चाहूल लागली असतानाच कोरोना रूग्णवाढीचा आलेख घसरला. गणेशोत्स आणि ईद नंतर कोरोना स्थिती काय राहते याकडे प्रशासन लक्ष ठेवून होते. मात्र रूग्णवाढीचा आलेख घसरताच राहिल्याने नवरात्रीत नियमांच्या चौकटीत का होईना पण दांडियाचा आनंद जिल्हावासियांना घेता आला. नवरा्त्रीनंतरही जिल्ह्यातील रूग्णवाढीचा आलेख आणखी घसरला आहे. त्यामुळे दिपावली खरेदीचा उत्साह शहरांसह ग्रामिण भागात ओसंडून वहात आहे.

लसीकरणाचा उच्चांक करण्यासाठी प्रयत्न

जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग पुन्हा उचल खाऊ नये, म्हणून जिल्हापरिषदेच्या आरोग्य विभागाने कंबर कसली आहे. गेले दोन वर्ष वैद्यकीय आरोग्य विभाग, आशा सेविका, अंगणवाडी सेविकांसह कोरोना योद्द्यांनी कोरोना आटोक्यात ठेवण्यासाठी कष्ट घेतले. लसीकरण सुरू झाल्यावर विशेष मोहिम राबवण्यात आली. आता दिपावलीच्या पार्श्वभुमीवरही आरोग्य विभाग लसीकरणात व्यस्त असून ‘लस आपल्या दारी’ हा उपक्रम अनेक शहरात सुरू झाला आहे. रूग्णवाहिकेतून डॉक्टर, आरोग्य सेविका हे लसीकरणासाठी जात आहेत. ज्यांनी लस घेतलेली नाही अशांचा शोध घेऊन लसीकरण केले जात आहे. हा उपक्रमही सध्या जिल्ह्यासाठी फलदायी ठरत आहे.

28 लाख नागरिकांचे लसीकरण

जिल्हय़ात लस घेणाऱ्या नागरिकांची एकूण संख्या 27 लाख 98 हजार 401 एवढी दिलासादायक झालेली असून यामध्ये पहिला डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 19 लाख 52 हजार 766 एवढी असून दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांची संख्या 8 लाख 45 हजार 635 एवढी झालेली आहे.

जिल्हय़ात मंगळवारपर्यंत

एकूण नमुने 22,13,134
एकूण बाधित 2,50,893
कोरोनामुक्त 2,43,238
एकूण मृत्यू 6,414
सक्रीय रुग्ण 579

जिल्हय़ात मंगळवारी
बाधित 68
मुक्त 161
मृत्यू 00

Related Stories

मराठा आरक्षणी इंद्रा साहणी निकालाचा विचार करावा

Amit Kulkarni

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळवल्याप्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल

Abhijeet Shinde

राजेंची वाट न पहाता 6 रोजी हॉकर्स चौपाटी सुरु करणार

Amit Kulkarni

खबरदार…जिलेबीला परवानगी नाकाराल तर

Amit Kulkarni

उंब्रज परिसरातील 7 जण तडीपार

Omkar B

केळवली धबधबा पर्यटकांनी बहरला!

Patil_p
error: Content is protected !!