तरुण भारत

ऑडिशन्समध्ये अजून होते रिजेक्ट

अभिनेत्री नेहा शर्माचा चित्रपट लवकरच

बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्माने 2010 मध्ये क्रूक चित्रपटाद्वारे पदार्पण केले होते. मागील 10 वर्षांपासून नेहा चित्रपटसृष्टीत कार्यरत आहे. अन्य कलाकारांप्रमाणे तिनेही मोठा संघर्ष केला आहे. नेहा लवकरच ‘आफत-ए-इश्क’ चित्रपटात दिसून येणार आहे.

Advertisements

माझा बॉलिवूडमधील प्रवास अत्यंत अवघड राहिला आहे. अनेक दिवस मी संकटात काढले आहेत. काही दिवस सोपे राहिले, काही आनंदांनी भरलेले तर काही दिवस नैराश्यात काढले आहेत. ऑडिशन्स आणि रिजेक्शन्सचे सत्र सुरूच राहिले. आज देखील हे घडते. पण एका कलाकाराच्या जीवनाचा हा हिस्सा असतो हे मी जाणून असल्याचे नेहा सांगते.

आतापर्यंतचा प्रवास चांगला राहिला आहे. जे काही केले ते स्वतःच्या मर्जीने केले असल्याने त्याची खंत नाही. माझा कुणीच गॉडफादर नाही. जे काही मिळविले ते स्वतःच्या बळावर असे तिने म्हटले आहे. चित्रपटसृष्टीत 10 वर्षे काढली असून आता कुठे मला कामे मिळू लागली आहेत. हव्याहव्याशा वाटणाऱया भूमिकांचे ऑफर मिळत असल्याचे ती सांगते.

Related Stories

टायगर-दिशा संबंधी मुंबई पोलिसांच्या ‘त्या’ ट्वीटची सोशल मीडियावर चर्चा

Abhijeet Shinde

‘गंगूबाई काठियावाडी’मधील इंटिमेट सीन हटविणार

Amit Kulkarni

‘दिल्ली क्राईम 2’मध्ये दिसणार रसिका दुग्गल

Patil_p

18 सप्टेंबरला रिलीज होणार फरहानचा ‘तुफान’

tarunbharat

‘संदीप और पिंकी फरार’चा नवा ट्रेलर

Patil_p

अरबाज खान, सोहेल खान, निर्वाण खान यांच्याविरोधात गुन्हा दाखल

Rohan_P
error: Content is protected !!