तरुण भारत

पेंग्विनसाठी स्वेटर विणणारा अवलिया

ऑस्ट्रेलियातील वृद्ध घ्यायचा जखमी पेंग्विनची काळजी

स्वेटर विणणे ही एक कला असून ती सर्वांनाच चांगल्याप्रकारे जमते असे नाही. पण ऑस्ट्रेलियातील सर्वात वृद्ध व्यक्ती हे काम जखमी मुक्या प्राण्यांसाठी करायचा. अल्प्रेड डेट किंवा अल्फी आता हयात नसले तरीही त्यांनी स्वतःच्या शानदार कार्याद्वारे ‘वय केवळ एक आकडा’ असल्याचे सिद्ध केले आहे. कारण ज्या वयात लोकांच्या नजरा धुसर होता, त्या वयात त्यांनी जीवनातील कित्येक दिवस अडचणींना तोंड देणाऱया जखमी पेंग्विन्ससाठी उबदार स्वेटर तयार करण्यात घालविले आहेत. सोशल मीडियावर त्यांची कहाणी व्हायरल होत आहे.

Advertisements

109 वर्षीय अल्फी डेट जखमी पेंग्विन्ससाठी स्वेटर विणायचे असे ट्विटरवर एका युजरने म्हटले आहे. या ट्विटला आतापर्यंत 44 हजारांहून अधिक लाइक्स आणि 6 हजारांहून अधिक रीट्विट मिळाले आहेत.

2001 मध्ये तेलगळती संकट (ऑईल स्पिल डिझास्टर) घडले तेव्हा फिलिप आयलँड नेचर पार्कमध्ये वाइल्डलाइफ क्लिनिक शेकडो हातांनी विणलेल्या स्वेटरसह तयार होते. त्यानंतर दक्षिणपश्चिम ऑस्ट्रेलियातील एका केयर होममध्ये स्थलांतरित झाल्यावर अल्फी यांनी ‘सिम्पल सिंगल-रिब आणि डबल-रिब स्वेटर’ विणणे सुरू केले होते.

विणकाम हा आपला छंद असल्याचे अल्फी यांना उमगले होते. अशा स्थितीत फिलिप आयलँड नेचर पार्कच्या वतीने दोन नर्सेसनी त्यांच्याशी संपर्क साधला आणि पेंग्विन्ससाठी स्वेटर विणण्याची विनंती केली. फिलिप बेटावर तेलगळतीमुळे 483 छोटय़ा पेंग्विन्सला रिहॅबिलेशन सेंटरमध्ये आणले गेले, ज्यातील 96 टक्के पेंग्विन्सना पुन्हा त्यांच्या अधिवासात सोडण्यात आले.

या संकटातून बाहेर पडल्यावर सेंटरला पेंग्विन्ससाठी आणखीन स्वेटर्सची गरज नव्हती. पण अल्फी यांच्यामुळेच या छोटय़ा पेंग्विन्सचा जीव वाचू शकला. 2016 मध्ये अल्फी यांचे निधन झाले असले तरीही त्यांचे योगदान कधीच विसरता येणार नाही.

Related Stories

दीपिकाचे आव्हान संपुष्टात

datta jadhav

मॉडर्नाची लस मुलांवर 100 टक्के प्रभावी

Patil_p

कॅनडात धोका वाढला

Patil_p

भारताची ‘हवा’ फारच खराब

Patil_p

कोरोनाकडे दुर्लक्ष; इटलीच्या पंतप्रधानांची तीन तास चौकशी

datta jadhav

पोप फ्रान्सिस यांना भेटण्यासाठी पंतप्रधान व्हॅटिकन सिटीमध्ये

Abhijeet Shinde
error: Content is protected !!