तरुण भारत

कंगाल पाकिस्तानला सौदी अरेबियाची मदत

पाकच्या मध्यवर्ती बँकेत जमा करणार 3 अब्ज डॉलर्स – इम्रान यांनी मानले आभार

वृत्तसंस्था / रियाध

Advertisements

अर्थव्यवस्थेची बिकट स्थिती आणि महागाईने बेहाल झालेल्या पाकिस्तानची मदत करण्यासाठी सौदी अरेबिया पुन्हा एकदा सरसावला आहे. सौदी फंड फॉर डेव्हलपमेंटने पाकिस्तानच्या मध्यवर्ती बँकेत 3 अब्ज डॉलर्स जमा करण्याची घोषणा केली आहे. याचबरोबर सौदी अरेबिया डेफर्ड पेमेंटसोबत 1.2 अब्ज डॉलर्सचा तेलपुरवठा देखील करणार आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांचे या मदतीसाठी आभार मानले आहेत. केएसए नेहमीच आमच्या संकटकाळात आमच्यासोबत उभे राहिले आहेत असे इम्रान यांनी म्हटले आहे.

इम्रान खान हे 23-25 ऑक्टोबरपर्यंत सौदी अरेबियाच्या दौऱयावर होते. इम्रान तेथे मिडल ईस्ट ग्रीन इनिशिएटिव्ह संमेलनाच्या उद्घाटन सोहळय़ात सामील झाले होते. इम्रान यांनी सोमवारी रियाधमध्ये युवराज मोहम्मद बिन सलमान बिन अब्दुलाजीज अल सौद यांची भेट घेतली होती. या भेटीच्या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाकडून मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

दुसरे मोठे पॅकेज

सौदी अरेबियाने मागील तीन वर्षांमध्ये पाकिस्तानला दिलेले हे दुसरे मोठे आर्थिक पॅकेज आहे. यापूर्वी 2018 मध्ये सौदी अरेबियाने पाकिस्तानला 6 अब्ज डॉलर्सचे आर्थिक पॅकेज दिले होते. यात स्टेट बँक ऑफ पाकिस्तानात 3 अब्ज डॉलर्सची ठेव आणि उर्वरित 3 अब्ज डॉलर्स वार्षिक आधारावर डेफर्ड पेमेंटवर तेलपुरवठय़ाच्या स्वरुपात देण्यात आले होते.

संबंधांमध्ये बिघाड

द्विपक्षीय संबंध बिघडल्याने पाकिस्तानला 3 अब्ज डॉलर्सच्या ठेवीपैकी 2 अब्ज डॉलर्स परत करावे लागले होते. मागील वर्षी दोन्ही देशांमधील संबंध बिघडले होते. जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हद्दपार करण्यात आल्याच्या मुद्दय़ावर भारताविरोधात कुठलाच निर्णय घेण्यास सौदी अरेबियाने नकार दिला होता. याप्रकरणी पाकिस्तानचे विदेशमंत्री शाह महमूद कुरैशी यांनी सौदी अरेबियालाच कठोर  इशारा दिला होता.

Related Stories

काबूल विमानतळाबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत ७ अफगाण नागरिकांचा मृत्यू

Abhijeet Shinde

जपानच्या 7 प्रातांमध्ये आणीबाणी

Patil_p

विद्यापीठामध्ये संसर्ग

Patil_p

91 वर्षीय अधिकाऱयाचा ‘निवृत्ती’चा विचार नाही

Patil_p

एक व्यक्ती खोकली तरी…

Omkar B

रशियात 8 लाख रुग्ण कोरोनामुक्त

datta jadhav
error: Content is protected !!