तरुण भारत

बिहारच्या राजकारणात ‘लालू रिटर्न्स’

बम चलेगा, न गोला, जीतेगा बस आपका लालू भोला

वृत्तसंस्था/ मुंगेर

Advertisements

बिहारच्या राजकारणात लालूप्रसाद यादव स्वतःच्या जुन्या शैलीसह परतले आहेत. तारापूर येथील प्रचारसभेत कित्येक वर्षांनंतर लालू ज्या शैलीसाठी ओळखले जायचे, त्याच शैलीत दिसून आले आहेत. त्यांनी नेहमीच्या शैलीत उपस्थित समुदायाला स्वतःसाठी घोषणा देण्यास भाग पाडले आहे. ठेठ बिहारी शैलीत भाषण करत लालूंनी समर्थक आणि राजद कार्यकर्त्यांना आपण अद्याप सक्रीय असल्याचा संदेश दिला आहे.

राजकीय खेळ पालटविण्याचे बळ आपल्यात अद्याप असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न त्यांनी या सभेतून केला आहे. पण बुधवारच्या सभेत त्यांच्या वाढत्या वयाचा प्रभाव स्पष्ट दिसून आला आहे.

तारापूर येथील सभेत बोलताना लालूंनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तेजस्वी यांनी त्यांची पाळेमुळे उखडली असून आता आम्ही विसर्जन करण्यासाठी आलो आहोत. “बम चलेगा, न गोला, जीतेगा बस आपला लालू भोला’ असा नाराही त्यांनी दिला आहे. तुरुंगातून बाहेर पडल्यावर राजद अध्यक्ष लालूप्रसादांनी पहिल्यांदाच जनतेला जाहीर व्यासपीठावरून संबोधित केले आहे.

नितीश कुमार लक्ष्य

नितीश कुमार लवकरच मातीमोल होणार आहेत. भाजपमध्ये जाणार नसल्याचे नितीश म्हणायचे. आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले. तेजस्वी यादव मुख्यमंत्री होणार होते, पण ऐनवेळी नितीश यांनी गडबड केली. आम्ही नितीश यांना पद दिले, पण त्यांनी विश्वासघात केला. नितीश कुमार कुणाचेच होऊ शकत नाही. आम्ही त्यांचे नाव पलटूराम ठेवले असल्याचे विधान लालूंनी केले आहे.

सोनिया गांधींशी चर्चा

राजद नेत्याने सांप्रदायिकता विरोधातील लढाई सुरू ठेवण्याची शपथ घेत पक्ष उमेदवाराला मत देण्याचे आवाहन जनतेला केले आहे. यापूर्वी लालूंनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी चर्चा केली होती. लालूप्रसाद प्रचारात उतरल्याने पोटनिवडणुकीत विजय मिळेल अशी आशा  राजदला आहे. लालू यादव चारा घोटाळय़ाप्रकरणी शिक्षा भोगत आहेत. तसेच शिक्षेमुळे त्यांना निवडणूक लढवता येत नाही.

थेट लढाई

तारापूर मतदारसंघात राजदचे अरुण कुमार साह यांच्या विरोधात संजदचे राजीव कुमार सिंह रिंगणात आहेत. स्वतः नितीश कुमार यांनी येथे प्रचार चालविला आहे. भाजपचे दिग्गज नेतेही प्रचारात उतरले आहेत. ही पोटनिवडणूक आता लालूप्रसाद यादव विरुद्ध नितीश कुमार यांच्यातील थेट लढाई असल्याचे म्हटले जातेय.

Related Stories

जगाला आता अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्सची चिंता

datta jadhav

वैज्ञानिकांकडून ‘सुपर’ लसीची निर्मिती

Omkar B

इटली : सरकार हतबल

Patil_p

दहशतवादी हल्ल्यांनी हादरले अफगाणिस्तान

Patil_p

कोरोना विषाणू पुन्हा बदलतोय स्वतःचे स्वरुप

Patil_p

युएनजीए अध्यक्षपदी अब्दुल्ला शाहिद यांची निवड

Patil_p
error: Content is protected !!