तरुण भारत

कॅनडात भारतीय वंशाची महिला संरक्षणमंत्री

अनिता आनंद यांना ट्रुडो सरकारमध्ये मिळाले स्थान

वृत्तसंस्था/ टोरंटो

Advertisements

भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या नव्या संरक्षणमंत्री झाल्या आहेत. पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांच्या मंत्रिमंडळातून माजी संरक्षणमंत्री हरजीत सिंह सज्जन यांना हटवून मंगळवारी त्यांना ही जबाबदारी देण्यात आली आहे.  अनिता आणि ट्रुडो  दोघेही लिबरल पार्टीचे सदस्य आहेत. मध्यावधी निवडणुकीत ट्रुडो यांची लिबरल पार्टी सत्तेवर परतल्यावर आणि मोठय़ा सैन्य सुधारणांयच आवाहनाच्या एक महिन्यांनी ही नियुक्ती झाली आहे.

कॅनडाच्या सैन्याला सुरक्षित असल्याची जाणीव करविणे ही माझी पहिली जबाबदारी असल्याचे संरक्षणमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यावर अनिता यांनी सांगितले आहे. कोरोना महामारीच्या काळात कॅनडासाठी लस खरेदी आणि पुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी अनिता यांच्यावरच होती.

अनिता यांनी सोशल मीडियावर पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांचे आभार मानले आहेत. कॅनडाचे सैन्य देशाच्या लोकांच्या रक्षणासाठी स्वतःचा जीव पणाला लावत आहे. सैनिकांना सुरक्षित आणि योग्य वातावरणात काम करू देण्याची गरज असल्याचे अनिता यांनी म्हटले आहे.

आईवडिल डॉक्टर

54 वर्षीय अनिता या पेशाने वकील आहेत. 2019 मध्ये त्या पहिल्यांदा कॅबिनेट मंत्री झाल्या होत्या. त्यांना सार्वजनिक सेवांसाठीचा खरेदीमंत्री करण्यात आले होते. कॅनडाचे संरक्षण मंत्रालय सांभाळणाऱया त्या दुसऱया महिला ठरणार आहेत. यापूर्वी 1990 मध्ये किम कॅम्बल यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. अनिता यांची आई तामिळनाडूची तर वडिल मूळचे पंजाबचे होते. पण त्यांचा जन्म कॅनडातच झाला होता.

सज्जन यांना का हटविले?

कॅनडाच्या अनेक सैन्याधिकाऱयांवर मागील काही काळापासून महिला सैनिकांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप होतोय. माजी संरक्षणमंत्री हरजीत सिंह सज्जन यांनी ही प्रकरणे योग्यप्रकारे हाताळली नसल्याचा आरोप आहे. संरक्षणतज्ञ देखील अनिता यांना संरक्षणमंत्री करण्याची मागणी करत होते. एका महिलेला संरक्षणमंत्रिपद देण्यात आल्याने सैन्यात लैंगिक शोषणाच्या पीडितांदरम्यान योग्य संदेश जाणार असल्याचे त्यांचे म्हणणे होते. सज्जन यांना आंतरराष्ट्रीय विकास एजेन्सी मंत्री करण्यात आले आहे.

Related Stories

चीनच्या राजदूताचा इस्रायलमध्ये संशयास्पद मृत्यू

datta jadhav

चंद्राच्या कक्षेतील बदलामुळे येणार पाऊस -पूर

Patil_p

भारतावरून झेपावले इम्रान यांचे विमान

Patil_p

अमेरिकेत कोरोनाबाधितांची संख्या 80 लाखांच्या उंबरठ्यावर

datta jadhav

ब्राझीलमध्ये बाधितांनी ओलांडला 1 कोटींचा टप्पा

datta jadhav

चीनमध्ये आता आणखी एक व्हायरस; 7 जणांचा मृत्यू तर 60 जणांना लागण

Rohan_P
error: Content is protected !!