तरुण भारत

तामिळनाडूत फटाक्यांच्या दुकानाला आग, 6 ठार

कल्लाकुरिचीमध्ये दुर्घटना -अनेक जण जखमी

वृत्तसंस्था / कल्लाकुरिची

Advertisements

तामिळनाडूच्या कल्लाकुरिची जिल्हय़ातील शंकरपुरम येथे फटाक्यांच्या दुकानात आग लागल्याने 6 जणांचा मृत्यू झाला आहे. सुमारे 10 जण या आगीत होरपळून जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आग कशामुळे लागली हे अद्याप स्पष्ट झालेले नसल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाला प्रयत्नांची शिकस्त करावी लागली आहे.

दिवाळीचा सण नजीक आल्याने दुकानात फटाक्यांचा मोठा साठा करण्यात आला होता. आग लागल्यावर मोठमोठय़ा ज्वाळा दिसून आल्या. तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा केली आहे. तर उपचार घेत असलेल्या जखमींसाठी 1 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी काही दिवसांपूर्वी दिल्ली, ओडिशा, राजस्थान तसेच हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून फटाक्यांच्या बंदीवर पुनर्विचार करण्याची विनंती केली होती. तसेच ग्रीन फटाक्यांच्या विक्रीला अनुमती देण्यास सांगितले होते. बंदीमुळे तामिळनाडूत फटाके निर्मिती उद्योगात सामील सुमारे 8 लाख कामगारांची उपजीविका संकटात सापडल्याचे स्टॅलिन यांनी नमूद केले होते.

Related Stories

पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, 5 ठार

Patil_p

‘या’ दिवशी होणार जेईई ॲडव्हान्सची परीक्षा : शिक्षणमंत्र्यांची घोषणा

Rohan_P

विजापूरमधील जवान काश्मीरमध्ये हुतात्मा

Patil_p

निकालावेळी जल्लोष अन् मिरवणुकीवर बंदी

Patil_p

उत्तराखंड दुर्घटनेतील मृतांची संख्या 61 वर; अजूनही 204 बेपत्ता

Rohan_P

सूरतमध्ये 48 फूट लांबीचा रामसेतू केक

Patil_p
error: Content is protected !!