तरुण भारत

स्पाइसजेटची नव्या 28मार्गांवर 31 पासून विमानसेवा

नवी दिल्ली 

  स्पाइसजेट या विमान कंपनीकडून सणासुदीच्या कालावधीची स्थिती लक्षात घेऊन 28 नवीन उड्डाणे सुरु करण्याची घोषणा केली आहे. कंपनीने 31 ऑक्टोबरपासून देशातील हवाई मार्गांवरील 28 नवीन मार्गांवर विमाने सोडली जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. यामध्ये स्पाइसजेट राजस्थानच्या जयपूर, जैसलमेर, जोधपूर आणि उदयपूरच्या पर्यटन स्थळांसह मुख्य महानगर आणि शहरांना नवीन विनाथांबा विमानसेवा सुरु करणार असल्याची माहिती आहे.

Advertisements

तिकिट बुकिंगची प्रक्रिया….

कंपनीने www.sज्ग्मरू.म्दस् स्पाइसजेटच्या मोबाईल ऍप आणि ऑनलाईन टॅव्हल्स आणि ट्रव्हल एजन्सीच्या माध्यमातून बुकिंग करण्याची सुविधा ग्राहकांना मिळणार असल्याची माहिती आहे. स्पाइसजेट मुख्य व्यावसायिक अधिकारी शिल्पा भाटिया यांनी म्हटले आहे, की ‘सणासुदीचा कालावधी आणि पर्यटन करणाऱयांची संख्या वेगाने वाढल्याने ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांची सोय व्हावी यासाठी आम्ही देशभरातील नवीन मार्गांवर विमान सेवा उपलब्ध करणार असल्याचेही भाटिया यांनी स्पष्ट केले आहे.’

Related Stories

आघाडीवरच्या शंभर ब्रॅण्ड्सना मोठा फटका बसण्याची शक्यता

Patil_p

शेअर बाजारात आज पुन्हा उसळी; सेन्सेक्स २९ हजार पार

tarunbharat

‘अमूल’ची विक्रमी महसूल कमाई

Patil_p

पिरामल फार्माने 20 टक्के हिस्सा विकला

Omkar B

कोटक महिंद्रा बँकेने व्याजदर घटवले

Patil_p

महिंद्रा 600 गाडय़ा परत मागविणार

Patil_p
error: Content is protected !!