तरुण भारत

झोमॅटोचा नाइलाजास्तव आयपीओ?

सीईओंचा खुलासा – कंपनीला संकटातून बाहेर काढण्यासाठीच निर्णय

नवी दिल्ली

Advertisements

 खाद्यपुरवठा आणि रेस्टॉरंट डिलिव्हरी प्लॅटफॉर्म अशी ओळख असणाऱया झोमॅटोला आवश्यकता नसतानाही बाजारात आयपीओ आणावा लागला आहे. कारण झोमॅटोकडे फक्त सहा महिन्यांपर्यंत राहिल इतकीच रोकड होती, यामुळेच कंपनीने आयपीओवर काम सुरु करुन तो बाजारात सादर केला असल्याचा खुलासा कंपनीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी दीपिंदर गोयल यांनी केला आहे.

कंपनी मोठय़ा आर्थिक संकटात फसली होती, आणि त्यामधून बाहेर पडण्यासाठी नाइलाजास्तव कंपनीला आपला आयपीओ बाजारात आणावा लागला असल्याचे स्पष्टीकरण यादरम्यान गोयल यांनी दिले आहे.

कोरोना महामारीच्या अगोदरपासून झोमॅटो अन्य मार्ग धुंडाळत होता, तसेच कंपनीचा व्यवसाय हा जवळपास 90 टक्क्यांनी घसरला होता. एफडीआय नियमांमध्ये केलेल्या बदलांचा परिणामही कंपनीवर झाला आहे. यामध्ये बिगर फायनान्स सारख्या चीनी कंपन्यांच्या गुंतवणुकीचे मार्ग बंद झाले होते.

विविध मार्गांची चाचपणी…..

आम्ही विविध गुंतवणूकदारांसोबत चर्चा केली परंतु त्यांचा कोणत्याही फायदा झाला नाही. याच दरम्यान कंपनीकडे फक्त सहा महिने शिल्लक राहिल इतकीच रोकड उपलब्ध होती. यासह अन्य संकटामधून बाहेर पडण्यासाठी आयपीओंचा मार्ग स्विकारावा लागला असल्याचे सीईओ गोयल यांनी स्पष्ट केले आहे.

12 अब्ज डॉलर मूल्य

कंपनीला   5 कोटी डॉलर उभारण्याची गरज होती, परंतु दरम्यानच्या कालावधीत अन्य घटना बदलल्या होत्या. यासोबतच मागील वर्षात कंपनीने आयपीओ आणण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी विविध अडचणींचा प्रवास कंपनीला करावा लागला. कंपनीने मार्केट रेग्युलेटर सेबीसोबत हात मिळवत काम केले आणि यासोबतच झोमॅटो ही आयपीओ आणणारी देशातील पहिली स्टार्टअप कंपनी ठरली असून याचे आज मूल्य 12 अब्ज डॉलरच्या घरात पोहोचले असल्याची माहिती आहे.

Related Stories

टीसीएलचा पहिला मिनी एलइडी टीव्ही लाँच

Patil_p

एस्कॉर्ट्स ट्रक्टर्सच्या विक्रीत 21 टक्के वाढ

Patil_p

आयात शुल्क कमी करण्यासाठी टेस्लाची धडपड

Patil_p

मायक्रोसॉफ्टने दिली कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी वर्क फ्रॉम होमची परवानगी

datta jadhav

बाजारातील सलगच्या घसरणीला अखेर विराम !

Patil_p

बेजोस लवकरच सीईओ पद सोडण्याचे संकेत

Patil_p
error: Content is protected !!