तरुण भारत

गुगलचे प्रगती ओएस मेड फॉर इंडिया स्मार्टफोनसाठी

दिवाळीला सादर होणार जिओफोन नेक्स्ट- गुगलच्या सीईओंची माहिती

नवी दिल्ली

Advertisements

 जिओफोन नेक्स्टच्या सादरीकरणासंदर्भातील तारखेसह अन्य फिचर्सबाबत गुगलचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सुंदर पिचाई यांनी खुलासा केला आहे. यावेळी ते म्हणाले ‘आम्ही रिलायन्ससोबत हातमिळवणी केल्यानंतर मेड फॉर इंडिया अफोर्डेबल स्मार्टफोन तयार केला आहे. यामध्ये कोणत्याही प्रीमियम स्मार्टफोनप्रमाणेची फिचर्स मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.’

सदरचा स्मार्टफोन हा जगातील सर्वात स्वस्त फोन म्हणून ओळख राहणार असून याचे सादरीकरण या अगोदर गणेश चतुर्थीला होणार होते, परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे लांबणीवर पडलेले स्मार्टफोनचे सादरीकरण हे दिवाळीला त्याच्या एक किंवा दोन दिवस अगोदर यांचे सादरीकरण होणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. 

गुगलची सहयोगी कंपनी अल्फाबेटचा तिमाही अहवाल सादर करण्यात आला या दरम्यान पिचाई यांनी अर्निंग कॉल इव्हेंटमध्ये जिओफोन नेक्स्टच्या सादरीकरणासंदर्भात माहिती दिली आहे. भारतामधील कोविडच्या संकटामुळे प्रभावीत राहिलेल्या स्थितीमुळे सादरीकरण लांबणीवर पडल्यामुळे या कालावधीत फोनच्या फिचर्समध्ये काही प्रमाणात बदल होत गेल्याची माहिती आहे. या स्मार्टफोन निर्मितीत रिलायन्स व गुगल यांची भागीदारी राहिल्याने एक सक्षम उत्पादन बाजारात आणण्यास दोन्ही कंपन्यांना यश मिळाले असल्याचे अभ्यासकांचे मत आहे.

प्रगती ओएसची निर्मिती

‘मेकिंग ऑफ जिओफोन नेक्स्ट’चा व्हिडीओ सादर करण्यात आला होता त्यामध्ये जिओफोन नेक्स्ट हा लाखो भारतीयांचे जीवन बदलण्याची स्थिती निर्माण करत असल्याचे संकेत आहेत. यासोबतच सदरच्या स्मार्टफोनमध्ये प्रगती ऑपरेटिंग सिस्टमवर सुरु राहणार असून या सिस्टमची निर्मिती ही जिओ आणि गुगल यांच्या टीमकडून तयार करण्यात आली आहे.

Related Stories

सिंगापुरी डॉलर नोट रद्दचा निर्णय

Omkar B

एप्रिलमध्ये खत विक्रीत 45 टक्के वाढ

Patil_p

भारतात ‘उबर’ची व्हॉटसऍपसोबत बुकिंगची सेवा

Amit Kulkarni

पियाजियोने दुचाकी विक्री केंद्रे केली सुरू

Patil_p

ऍपलकडून 5 जी कनेक्टिव्हीटीचा आयपॅड प्रो सादर

Patil_p

टाटा कम्युनिकेशनचे फ्रान्सच्या ‘ईसिम’कडून अधिग्रहण

Omkar B
error: Content is protected !!