तरुण भारत

परतीचा मार्ग

काँग्रेसच्या अध्यक्षपदी राहुल गांधी यांच्या परतीसाठीचा मार्ग खोदण्यास काँग्रेसने सुरुवात केली आहे. निवडणुकीच्या मार्गाने राहुल गांधी यांना अध्यक्ष व्हायचे असेल तर पुढील वषीच्या सप्टेंबर महिन्यापर्यंत सर्व प्रक्रिया पूर्ण करून मग पदावर विराजमान होता येईल. पण उत्तर प्रदेश, पंजाबसह विविध राज्यांच्या निवडणुका असताना पक्षाला सक्रिय अध्यक्ष हवा आहे. लोकांसमोर जाणारा, मोठय़ा सभा करणारा आणि लोकांमध्ये मिसळणारा एक युवा अध्यक्ष ही काँग्रेसची गरज आहे. त्यादृष्टीने काँग्रेस सरचिटणीसांची झालेली बैठक आणि त्यात सोनिया गांधी यांनी आक्रमकपणे बंडखोर नेत्यांना दिलेल्या कानपिचक्यातून राहुल यांचा मार्ग मोकळा होण्याचेच चिन्ह आहे. जुन्या काँग्रेस नेत्यांशी जुळत नसल्यानेच राहुल यांनी अध्यक्षपद सोडले होते. लोकसभेला पराभव हे कारण ठरले. नेत्यांना प्रचारात रस नसल्याने न्याय योजना जनतेपर्यंत पोहचली नाही. अनेक नेते केवळ आपल्या मुलांच्या तिकिटासाठी आग्रही राहिले. बालाकोट कारवाई आणि मोदींची दुसरी लाट इतक्मया जोरात आली की त्यामध्ये राहुल गांधी यांच्यापासून काँग्रेसच्या बडय़ा बडय़ा मंडळींना पराभवाला सामोरे जावे लागले. केवळ जुन्या नेत्यांच्या हट्टाने पराभव झाला नाही. काँग्रेसचे प्रादेशिक नेतृत्व कमकुवत करत आणल्याचा आणि त्यातूनच संघटन मोडकळीस आल्याचा फटका काँग्रेसला बसला. जे काही नेते या लाटेत टिकून राहिले आहेत त्यांना स्वतःच्या कर्तुत्वावर पक्ष आपल्या भागात टिकून आहे. केंद्रीय नेतृत्वाचा काहीही वाटा नाही, त्यामुळे आपल्या राज्यात काय निर्णय घ्यायचा ते आपणच ठरवू असा त्यांचा हट्टाग्रह वाढला. त्यामुळेच कॅप्टन अमरेंद्र सिंह, कमलनाथ, अशोक गहलोत अशा नेत्यांच्या दबावापुढे सत्ता असलेल्या राज्यात काँग्रेसला झुकावे लागले. परिणामी राहूल यांच्या समवयस्क नेत्यांना पक्ष सोडावा लागला. ह्याच कारभारामुळे भाजपने मध्य प्रदेश हिसकावून घेतला. पण अशोक गहलोत यांनी राजस्थानमध्ये तो डाव उधळून लावला. छत्तीसगड, पंजाब आणि राजस्थान या राज्यांमध्ये काँग्रेसचे आव्हान टिकून असल्याने राहूल विरोधी नेत्यांना स्फुरण चढले. दरम्यानच्या काळात महाराष्ट्रात स्थापन झालेले महाविकास आघाडी सरकार आणि शिवसेनेशी हातमिळवणी असो किंवा ममता बॅनर्जी यांच्याशी जुळवून घेणे, भाजपेतर पक्षांना एकत्र आणण्यासाठीचे प्रयत्न असोत, ही सर्व कामे हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी यांच्यामुळेच काँग्रेसला यशस्वी करता आली. नंतर राहुल गांधी यांनीही हे वास्तव स्वीकारले. त्यामुळे राहूल यांना अपेक्षित असणारी युवा नेतृत्वाच्या फळीसाठी जिग्नेश मेवाणी पासून कन्हैया कुमार पर्यंत विविध चर्चित चेहऱयांना काँग्रेसचे द्वार खुले झाले. ज्यामुळे राहूल सकारात्मक बनले. काँग्रेस बंडखोर नेत्यांवर सोनिया गांधी यांचा जितका दबाव पडतो तितकाच राहुल गांधी यांच्यामुळे दुरावा निर्माण होतो असे वातावरण आहे. त्यात पंजाबचे मुख्यमंत्री बदलताना कॅप्टन आणि नवज्योत सिंग सिद्धू या दोन्ही नेत्यांना दुखावण्याची वेळ काँग्रेसवर आली. स्वतः राहुल गांधी त्या शपथविधीसाठी पंजाबमध्ये हजर होते. मनीष तिवारिंसह विविध नेते अजूनही काँग्रेसच्या या निर्णयावर टीका करतच आहेत. अशा सगळय़ा वातावरणात राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांची एकाकी लढाई सुरू आहे आणि काँग्रेसचे दुढ्ढाचार्य ती लढाई आणि त्यांची होणारी अवहेलना पाहत बसले असावेत. काँग्रेस नेत्यांच्या या प्रकारानंतरसुद्धा उत्तर प्रदेशमध्ये राहुल आणि प्रियांका गांधी यांनी भाजपचे आव्हान स्वीकारून ज्या पद्धतीने विविध मुद्दे उठवत तेथे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रियंका यांना पुढे करून चाळीस टक्के महिलांना तिकीट जाहीर करणे, बेटी हूं लड सक्ती हूं कॅम्पेन, निवडणुकीपूर्वीच संपूर्ण उत्तर प्रदेशची रॅली आदी उपक्रम प्रियांका गांधी यांनी हाती घेतले आहेत. उत्तर प्रदेशात प्रदीर्घ काळ सत्तेपासून दूर गेल्यानंतर आणि आजची आमदार संख्या अवघी सातवर पोहोचलेली असताना त्यांनी ती जबाबदारी स्वीकारणे म्हणजे मोठेच आव्हान आहे. यापूर्वी कोणत्याही काँग्रेस नेत्याच्या वाटय़ाला इतक्मया दारुण स्थितीचे नेतृत्व करण्याची जबाबदारी पडली नसेल. आणीबाणीच्या काळानंतर काँग्रेसमधल्या अनेक नेत्यांनी संजय गांधी यांना नावे ठेवत आपले नेतृत्व सिद्ध करण्यासाठी गांधी परिवाराला दूर ठेवले होते. मात्र इंदिरा गांधी यांचा झंझावाती प्रचार आणि वक्तव्यापुढे त्या नेत्यांचा टिकाव लागला नाही. अर्थात तोपर्यंत जनता पक्षाच्या बाबतीत लोकांचा भ्रमनिरास झालेला होता आणि अखिल भारतीय काँग्रेसचे नेते एकमेकावरच संशय व्यक्त करत होते. काही आतून इंदिरा गांधी यांना मिळाले होते. त्यामुळे स्वतःचे नेतृत्व पुन्हा सिद्ध करणे गांधी परिवाराला शक्मय झाले. संजय गांधी यांचा अपघाती मृत्यू आणि इंदिरा गांधी यांची पुढची कारकीर्द यामुळे त्या काळाला लोक लवकरच विसरले. पण आजच्या काँग्रेसची स्थिती तशी नाही. राहुल गांधी यांना स्वतःला सिद्ध करावे लागणार आहे. भाजपचे आव्हान नंतर आधी स्वपक्षातील नेत्यांनाच आव्हान देऊन त्यांना पुढे यायचे आहे. त्या दृष्टीने त्यांच्या विरोधात काँग्रेस नेते जाऊ नयेत याची पुरती तजवीज करत सोनिया गांधी यांनी काँग्रेसच्या जुन्या नेत्यांनाच पक्षाचे ध्येय धोरण माहिती पाहिजे, शिस्त आली पाहिजे आणि पक्षहितासाठी आपापले राज्य सांभाळण्याची तयारी दर्शवली पाहिजे असे सुचवले आहे. दिल्लीच्या दरबारी राजकारणात रुळलेल्या नेत्यांना हे काम पेलणे अवघड ठरू शकते किंवा राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याऐवजी आपल्या राज्यातून काम करावे लागू शकते. काँग्रेसच्या लोकसभेतील नेत्यांना मात्र राहुल गांधी यांनी तात्काळ कार्यकारी अध्यक्षपद स्वीकारावे आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली राज्यांच्या आणि पक्षांतर्गत निवडणूक प्रक्रिया पार पाडावी असे वाटते. राहुल गांधी यांनीही त्यावर विचार करण्याचे संकेत दिले आहेत. यामुळे कदाचित ते नजीकच्या काळात अध्यक्षपद स्वीकारतील. त्यादृष्टीनेच सोनिया गांधी यांनी वरि÷ नेत्यांना कानपिचक्मया दिल्या असाव्यात.

Related Stories

राममंदिर आणि रामराज्य!

Patil_p

असाध्य ते साध्य…

Patil_p

रामकथा

Patil_p

ऑपरेशन डिकॉय!

Patil_p

कोरोनाच्या लढय़ात अखंड सावधपणच कामी येणार

Patil_p

तिसऱया सत्रातही बाजार घसरणीत

Patil_p
error: Content is protected !!