तरुण भारत

नवीन पक्ष सर्व 117 जागा लढवेल!

पक्षाचे नाव-चिन्ह लवकरच – स्वतः सिद्धूंविरोधात लढणार – कॅप्टन अमरिंदर सिंह यांची घोषणा

चंदिगढ / वृत्तसंस्था

Advertisements

मी नवीन राजकीय पक्ष सुरू करत असून येत्या विधानसभा निवडणुकीत आपला पक्ष सर्व 117 जागांवर लढणार असल्याची घोषणा पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी चंदिगढ येथे पत्रकार परिषदेत केली. त्यांनी नवीन पक्षाची घोषणा केली असली तरी अद्याप नाव जाहीर केलेले नाही. निवडणूक आयोगाने पक्षाचे नाव आणि चिन्ह मंजूर केल्यावर पक्षाचे नाव जाहीर करू असे त्यांनी स्पष्ट केले.

कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मागील आठवडय़ातच नवीन पक्ष स्थापन करण्याबाबत सुतोवाच केले होते. तसेच आपण आता काँग्रेससोबत जाणार नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले होते. याचदरम्यान भारतीय जनता पक्षाबरोबर जवळीक साधण्याचे संकेत देत 2022 मध्ये होणाऱया निवडणुकांमध्ये विधानसभेच्या जागांच्या वाटाघाटीसाठीदेखील तयार असतील, असे ते म्हणाले होते. त्यानुसार, बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ‘हो मी एक नवीन राजकीय पक्ष सुरू करणार आहे. निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाल्यावर निवडणूक चिन्हासह नव्या पक्षाच्या नावाची घोषणा करण्यात येईल. माझे वकील या विषयावर काम करत आहेत, असे जाहीर केले. तसेच नवज्योत सिंग सिद्धू लढणाऱया मतदारसंघात आपण स्वतः त्याच्याविरोधात उतरणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अमित शाह यांना आज शिष्टमंडळासह भेटणार

केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यासंदर्भात अमरिंदर सिंह गुरुवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह केंद्रीय मंत्र्यांची भेट घेणार आहेत. आम्ही जवळपास 25-30 लोक दिल्लीला जाणार आहोत. या भेटीत गृहमंत्र्यांची भेट घेणार आहोत, असे ते म्हणाले. तसेच सुरक्षा व्यवस्थेसंदर्भात माझी चेष्टा केली जाते. माझे मूळ प्रशिक्षणच सैनिकाचे आहे. मी 10 वर्षे भारतीय सैन्यात काम केले आहे. त्यामुळे मला याबाबत माहिती आहे, असे स्पष्टीकरणही त्यांन दिले.

जाहीरनाम्यातून दिली कामगिरीची माहिती पत्रकार परिषदेत कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी मुख्यमंत्री असताना आपण केलेल्या कामांचा लेखाजोखाही मांडला. गेल्या साडेचार वर्षांच्या कारकिर्दीत मी जी कामगिरी करून दाखवली, जी विकासकामे राबविली त्याची सर्व कागदपत्रे इथे आहेत. मी मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी सांभाळताना प्रसिद्ध केलेला जाहीरनामा आणि आम्ही जे करून दाखवले त्याचाही जाहीरनामा येथे असून तो पाहिल्यास माझी कामगिरी समजेल, असे ते म्हणाले.

Related Stories

सलमान खानला पुन्हा दिलासा

Patil_p

भारतात सापडल्या कोविशिल्डच्या बनावट लसी

Abhijeet Shinde

ग्रेटा थनबर्गकडून दिशा रवीची पाठराखण

Patil_p

पुष्कर सिंह धामी उत्तराखंडचे नवे मुख्यमंत्री

datta jadhav

पी. चिदंबरम यांच्या मुलाला कोरोनाची बाधा

Rohan_P

राजनाथ सिंग यांनी घेतली अँटनी-पवार यांची भेट

Patil_p
error: Content is protected !!