तरुण भारत

दिवसाच्या विश्रांतीनंतर पुन्हा इंधनदरात वाढ

पेट्रोल-डिझेलच्या दरात प्रतिलिटर 34 ते 37 पैसे वाढ

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पेट्रोलियम कंपन्यांनी सलग सहा दिवस भाववाढ केल्यानंतर मंगळवारी एक दिवस वाहनधारकांची दरवाढीपासून सुटका झाली होती. मात्र, बुधवारी पुन्हा पेट्रोल, डिझेलच्या दरात प्रतिलिटर 34 ते 37 पैशांची दरवाढ झाली आहे. पेट्रोलच्या दरात बुधवारी लिटरमागे 34 पैशांनी वाढ करण्यात आली. तसेच डिझेलचे दरही साधारणपणे त्याच पातळीवर वाढले आहेत. या वाढीमुळे मध्यप्रदेशमधील सीमावर्ती जिल्हय़ांमध्ये पेट्रोल दराने प्रतिलिटर 120 रुपयांचा टप्पा ओलांडला. तसेच डिझेल दरही आता प्रतिलिटर 110 रुपयांजवळ पोहोचले आहेत. मध्यप्रदेशमध्ये सध्या देशातील सर्वोच्च दराने इंधनाची विक्री केली जात आहे.

देशात महागाईचा दिवसागणिक भडका उडताना दिसत आहे. ऐन दिवाळीत पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोलची किंमत 113.80 वर पोहोचली आहे. तर दिल्लीत पेट्रोल 107.94 झाले आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीचा भडका उडाल्याने महागाईत भर पडली आहे. महाराष्ट्रात पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर हे शंभरीच्या पुढे गेले आहेत. तसेच दिल्लीत पेट्रोल 107.94 रुपये तर डिझेल 96.67 रुपये दराने विकले जात आहे. कोलकातामध्ये पेट्रोलचा दर 108.45 तर डिझेल 99.78 रुपयांवर पोहोचले आहे.

Related Stories

जम्मू काश्मीरमध्ये कोरोना बाधितांची संख्या 20 हजार पार

Rohan_P

पंतप्रधान मोदींच्या पुतणीलाच भाजपने नाकारले तिकीट

datta jadhav

झारखंडमध्ये 5 उग्रवादी अटकेत

Patil_p

दहशतवादाविरोधात जगाने एकत्रित यावे!

Amit Kulkarni

येत्या दोन वर्षात सर्व टोलनाके गुंडाळणार

Patil_p

व्हिसावरील निर्बंध शिथिल

Patil_p
error: Content is protected !!