तरुण भारत

कोव्हॅक्सिनसंबंधी आणखी माहिती मागविली

अद्यापही ‘हू’ ची मान्यता नाहीच, विलंब लागण्याची शक्यता

@ नवी दिल्ली / वृत्तसंसथा

Advertisements

कोव्हॅक्सिन या भारतीय लसीला येत्या 24 तासांमध्ये मान्यता मिळण्याची शक्यता आहे, असे संयुक्त राष्ट्रसंघाच्या अधिकाऱयांनी मंगळवारीच स्पष्ट केले असले तरी अद्यापही जागतिक आरोग्य संघटनेकडून या लसीला मान्यता देण्यात आल्नेली नाही. या लसीची निर्मिती केलेल्या भारत बायोटेक या कंपनीकडून आणखी माहिती मागविण्यात आली आहे, असे संघटनेने स्पष्ट केले.

संयुक्त राष्ट्र संघाच्या अंतर्गत काम करणाऱया जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताच्या या स्वदेशनिर्मित लसीची अंतिम लाभ-धोका चाचणी सुरु आहे. ही चाचणी निर्वेधपणे पार पडल्यानंतरच या लसीला तातडीच्या उपयोगासाठी मान्यता दिली जाणार आहे. आम्हाला या अंतिम चाचणीसाठी आणखी माहिती आणि स्पष्टीकरणाची आवश्यकता असून माहिती आणि सष्टीकरण कंपनीकडून मागविण्यग्नात आले आहे. ते मिळाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल. तोपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार आहे, असे संघटनेने बुधवारी प्रतिपादन केले.

3 नोव्हेंबरला अंतिम मूल्यांकन

सध्या कोव्हॅक्सिनच्या मूल्यांकनाची प्रक्रिया जागतिक आरोग्य संघटनेकडून करण्यात येत आहे. 3 नोव्हेंबरला अंतिम मूल्यांकन होईल. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱयांची आणि तज्ञांची बैठक होणार आहे. भारत बायोटेककडून या आठवडय़ाच्या अखेरीपर्यंत सर्व माहिती आणि स्पष्टीकरण मिळेल अशी अपेक्षा आहे. ती मिळाल्यानंतर तिचे मूल्यमापन करुन अंतिम निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन जागतिक आरोग्य संघटनेच्या ज्येष्ठ पदाधिकाऱयांनी केले.

स्वतंत्र संस्थेकडून मूल्यांकन

लसीचे मूल्यांकन करण्याचे उत्तरदायित्व एका स्वतंत्र सल्लागार संस्थेकडे देण्यात आले आहे. या संस्थेकडून सकारात्मक अहवाल आल्यानंतरच संघटना कोणत्याही लसीला मान्यता देते. हीच प्रक्रिया कोव्हॅक्सिन लसीसंबंधी उपयोगात आणण्यात आली आहे, असे आरोग्य संघटनेने आपल्या वक्तव्यात स्पष्ट पेले आहे.

Related Stories

हिजबुल कमांडर नालीसह पाच दहशतवाद्यांचा खात्मा

Patil_p

पंजाब : 338 नवे रुग्ण; 535 जणांना डिस्चार्ज !

Rohan_P

लसीच्या भीतीने ग्रामस्थांची ‘शरयू’त उडी

Patil_p

स्वतः शिकल्यावर आता देतेय ज्ञानाचे धडे

Patil_p

एक कोरोनामुक्त गाव

Amit Kulkarni

देशात 18,177 नवे बाधित, 217 मृत्यू

datta jadhav
error: Content is protected !!