तरुण भारत

बॉम्बस्फोटप्रकरणी 10 आरोपी दोषी

गांधी मैदान बॉम्बस्फोट ः एकाची निर्दोष मुक्तता ः 1 नोव्हेंबरला शिक्षा सुनावणार

पटना  / वृत्तसंस्था

Advertisements

आठ वर्षांपूर्वी पाटण्यातील गांधी मैदानावर नरेंद्र मोदींच्या हुंकार सभेत बॉम्बस्फोटांची मालिका घडली होती. याप्रकरणी बुधवारी एनआयएच्या विशेष न्यायालयाने दहा संशयितांना दोषी ठरविले आहे. तसेच फखरुद्दीन या एका संशयिताची या प्रकरणातून सुटका केली आहे. हैदर अली, नुमान अन्सारी, मजीबुल्लाह, उमर सिद्दिकी, फिरोज अस्लम, इम्तियाज आलम यांच्यासह दहा जणांना शिक्षा सुनावण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे. 1 नोव्हेंबर रोजी दोषींना शिक्षा सुनावण्यात येणार असल्याचे एनआयए न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी जाहीर केले आहे.

पटना येथील गांधी मैदान येथे ऑक्टोबर 2013 मध्ये नरेंद्र मोदी यांच्या हुंकार रॅलीदरम्यान बॉम्बस्फोट घडवण्यात आला होता. याच सभेमध्ये नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पक्षाकडून राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असल्याची घोषणा झाली होती. या स्फोटात सहा जणांचा मृत्यू झाला तर 80 हून अधिक जण जखमी झाले होते. याप्रकरणी एफआयआर दाखल केल्यानंतर 31 ऑक्टोबर 2013 रोजी एनआयएने या प्रकरणाचा ताबा घेत 1 नोव्हेंबर रोजी दिल्ली एनआयए पोलीस ठाण्यात पुन्हा एफआयआर नोंदवले होते. त्यानंतर तपासाअंती एका अल्पवयीनासह 12 जणांवर आरोपपत्र दाखल करण्यात आले. त्यापैकी एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्याचबरोबर, अल्पवयीन आरोपीला यापूर्वीच जुवेनाईल बोर्डाने तीन वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात आरोपी असलेल्या पाच दहशतवाद्यांना यापूर्वीच अन्य एका प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

Related Stories

भारतात कोरोनाबाधितांनी ओलांडला 40 लाखाचा टप्पा

datta jadhav

उत्तराखंड : 227 नवे रुग्ण; 5 जणांचा मृत्यू

Rohan_P

नितीश कुमार सरकारमधील कॅबिनेट मंत्री विनोद कुमार सिंह यांचे निधन

Rohan_P

आजपासून ताजमहल पर्यटकांसाठी खुला

datta jadhav

कोरोनाची धास्ती : बिहारमध्ये 16 ऑगस्टपर्यंत वाढवले लॉक डाऊन

Rohan_P

बिहारमध्ये ‘एनआरसी’ नाही : नितीश कुमार

Patil_p
error: Content is protected !!