तरुण भारत

राज्य सरकारी कर्मचाऱयांना दिवाळीआधीच खूषखबर

प्रतिनिधी/ बेंगळूर

राज्य सरकारी कर्मचाऱयांना 1 जुलैपासूनच लागू होईल याप्रमाणे महागाई भत्त्यात 3 टक्के वाढ करण्यात आली आहे. बुधवारी राज्य सरकारने यासंबंधीचा आदेश दिला आहे. सरकारी कर्मचाऱयांच्या मूळ वेतनाच्या 21.50 टक्के असणारा महागाई भत्ता 24.50 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे. यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱयांना दिवाळीआधीच खूषखबर मिळाली आहे.

Advertisements

केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 28 टक्क्यांवरून 31 टक्के केला होता. आता राज्य सरकारच्या निवृत्ती वेतनधारकांना आणि राज्य संचित निधीतून निवृत्तीवेतन आणि कुटुंब निवृत्ती वेतन घेणाऱया अनुदानित शिक्षण संस्थांमधील निवृत्त कर्मचाऱयांनाही भत्तावाढ लागू असणार आहे.

सरकारी आणि जिल्हा पंचायतींमधील पूर्णवेळ कर्मचाऱयांना, सरकारचे अनुदान घेणाऱया शिक्षण संस्थांमधील कर्मचारी आणि विद्यापीठांमधील पूर्णवेळ कर्मचाऱयांनाही भत्तावाढीचा आदेश लागू असणार आहे. युजीसी/ एआयसीटीइ/ आयसीएआर/ एनजेपीसीच्या वेतन श्रेणीनुसार वेतन घेत असलेले कर्मचारी आणि एनजेपीसी पेन्शनधारकांसाठी महागाई भत्तावाढीसंबंधी स्वतंत्रपणे आदेश जारी करण्यात येईल, अशी माहिती अर्थखात्याने दिली आहे.

तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच जुलैमध्ये राज्य सरकारने आपल्या कर्मचाऱयांचा महागाई भत्ता 11.15 टक्क्यांवरून 21.50 टक्क्यांपर्यंत वाढविला होता. आता त्यात पुन्हा तीन टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. भत्तावाढीमुळे 6 लाख सरकारी कर्मचारी, 4.5 लाख पेन्शनधारक आणि विविध निगम-महामंडळांमध्ये सेवा बजावत असलेल्या 3 लाख कर्मचाऱयांना अनुकूल होणार आहे.

Related Stories

सप्टेंबरपर्यंत मिळणार आणखी एक लस

Patil_p

बिहारमध्ये कोरोना बाधितांनी ओलांडला 2.52 लाखांचा टप्पा

Rohan_P

ज्येष्ठ बंगाली अभिनेते सौमित्र चॅटर्जी यांचे निधन

datta jadhav

दिल्लीत गेल्या 24 तासात 1840 नवे कोरोना रुग्ण ; 22 मृत्यू

Rohan_P

केरळ मंत्रिमंडळात 21 जणांचा समावेश

Patil_p

आपल्यासमोर आता गावांपर्यंत कोरोना पोहोचू न देण्याचे आवाहन : नरेंद्र मोदी

Rohan_P
error: Content is protected !!