तरुण भारत

दहशतवाद्यांचा गट घुसखोरीच्या प्रयत्नात

जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा यंत्रणा सतर्क- गुप्तचर खात्याकडून अलर्ट जारी

श्रीनगर / वृत्तसंस्था

Advertisements

गेल्या काही दिवसात काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या घुसखोरीचे प्रमाण वाढले असतानाच आणखी काही दहशतवादी भारतीय हद्दीत प्रवेश करणार असल्याची माहिती गुप्तचर विभागाला प्राप्त झाली आहे. तसेच सहा दहशतवाद्यांचा एक गट जम्मूच्या राष्ट्रीय महामार्गावरून खोऱयात प्रवेश करणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर सर्व नाक्यांवर कडेकोट बंदोबस्त व तपासणी केली जात आहे.

गुप्तचर यंत्रणांच्या अहवालानुसार, नियंत्रण रेषेवर तयार करण्यात आलेल्या लाँचिंग पॅडवर मोठय़ा प्रमाणात दहशतवाद्यांची उपस्थिती दिसून येत आहे. जम्मू-काश्मीरमध्ये सुमारे 250 दहशतवादी घुसखोरीच्या प्रयत्नात आहेत. नियंत्रण रेषेवर बर्फवृष्टी होण्याआधी आणि घुसखोरीचे मार्ग बंद करण्याआधी, मोठय़ा प्रमाणात दहशतवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करू शकतात. मात्र, सीमेवर लष्कर आणि बीएसएफच्या कडेकोट बंदोबस्तामुळे दहशतवाद्यांना फारसे यश मिळत नाही. घुसखोरीच्या पार्श्वभूमीवर जम्मूच्या पुँछ आणि राजौरीमध्ये गेल्या पंधरा दिवसांपासून दहशतवाद्यांविरोधात जोरदार मोहीम हाती घेण्यात आली आहे. 

तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळात खळबळ उडाली आहे. अफगाणमध्ये अस्थैर्य निर्माण झाल्यापासून विविध संघटना दहशतवाद्यांना भारतात घुसवण्याचा कट रचत आहेत.  जम्मूला लागून असलेल्या आंतरराष्ट्रीय सीमेवरूनही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. पाकिस्तानच्या गुप्तचर यंत्रणांचेही त्यांना पाठबळ मिळत आहे.

टेरर फंडिंगप्रकरणी एनआयएचे छापे

जम्मू काश्मीरमध्ये बुधवारी एनआयएने अनेक जागांवर छापे टाकले. टेरर फंडिंगप्रकरणी प्रतिबंधित जमात-ए-इस्लामी (जेईआय) गटाच्या विरोधात अनेक दिवसांपासून तपास सुरू आहे. एनआयएने सकाळी 6 वाजेपासून जम्मू काश्मीर पोलीस आणि सीआरपीएफसोबत शोधमोहीम राबवली. हे छापे श्रीनगर, बडगाम, गंदरबल, बारामुल्ला, कुपवाडा, बांदीपोरा, अनंतनाग, शोपियान, पुलवामा, कुलगाम, रामबन, डोडा, किश्तवाड आदी भागात टाकण्यात आले. गेल्या दोन महिन्यात एनआयएने 61 ठिकाणी छापे टाकले आहेत. झडतीदरम्यान एनआयएने संशयितांच्या आवारातून विविध कागदपत्रे, डिजिटल उपकरणे आणि इतर साहित्य जप्त केले आहे.

Related Stories

देशात 30,093 नवे बाधित

datta jadhav

देशात बलात्काराचं सत्र सुरूच, महिला कॉन्स्टेबलवर तिघांनी बलात्कार करत रेकॉर्ड केला व्हिडिओ

Abhijeet Shinde

‘कोवॅक्सिन’ डेल्टा प्लस व्हेरिएंटविरोधात प्रभावी

datta jadhav

बाधित घटले, डिस्चार्ज वाढले!

Patil_p

2022 पर्यंत 36 राफेल विमाने ताफ्यात

Patil_p

विक्रमी! देशात 24 तासात 1,68,912 बाधितांची नोंद

datta jadhav
error: Content is protected !!