तरुण भारत

विराट कोहली, राहुल यांची मानांकनात घसरण

वृत्त संस्था/ दुबई

आयसीसीच्या बुधवारी घोषित टी-20 फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि केएल राहुल यांच्या क्रमवारीत घसरण झाली. या मानांकन यादीत कोहली सध्या पाचव्या तर राहुल आठव्या स्थानावर आहे.

Advertisements

सध्या येथे सुरू असलेल्या आयसीसी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाक विरूद्ध भारताला 10 गडय़ांनी एकतर्फी पराभव पत्करावा लागला. या सामन्यात कोहलीने 49 चेंडूत 57 तर राहूलने केवळ 3 धावा जमविल्या. टी-20 फलंदाजांच्या मानांकन यादीत कोहली यापूर्वी चौथ्या स्थानावर होता. आता तो 725 मानांकन गुणांसह पाचव्या स्थानावर आहे. त्याचे स्थान एका अंकांनी घसरले. सहाव्या स्थानावरील केएल राहुल देखील 684 मानांकन गुणांसह आठव्या स्थानावर घसरला. या मानांकन यादीत पाकचा सलामीचा फलंदाज मोहम्मद रिझवानने कोहलीला चौथ्या स्थानावरून खाली ढकलले. भारताविरूद्ध रिझवानने नाबाद 79 तर मंगळवारी न्यूझीलंडविरूद्ध सामन्यात 33 धावांची खेळी केली. याचे प्रतिबिंब अपेक्षेप्रमाणे मानांकनात उमटले.

दक्षिण आफ्रिकेचा सलामीचा फलंदाज मार्करमने या मानांकन यादीत तिसरे स्थान मिळविले. मार्करमने ऑस्ट्रेलियाविरूद्ध 40 तर विंडीजविरूद्ध नाबाद 51 धावा झळकविल्या होत्या. मार्करमचे मानांकनातील स्थान आठ अंकांनी वधारले आहे. या ताज्या मानांकन यादीत पाकचा कर्णधार बाबर आझम 820 मानांकन गुणांसह  दुसऱया तर इंग्लंडचा डेव्हिड मलान 831 गुणांसह पहिल्या स्थानावर आहे. अफगाणच्या गुरबाजने 12 वे स्थान मिळविले असून बांगलादेशला सलामीचा फलंदाज मोहम्मद नईमने 13 वे स्थान मिळविले आहे.

टी-20 गोलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत पहिले 9 गोलंदाज फिरकी आहेत. बांगलादेशच्या मेहदी हसनने 12 वे स्थान मिळविले आहे. पाकचा वेगवान गोलंदाज शाहीन अफ्रिदी मेहदी हसनसमवेत संयुक्त 12 व्या स्थानी आहे. अष्टपैलूच्या मानांकन यादीत बांगलादेशचा शकीब अल हसनने आपले अग्रस्थान कायम राखले आहे.

Related Stories

इंग्लंड महिलांचा भारतावर वनडे मालिका विजय

Amit Kulkarni

मँचेस्टर युनायटेड उपांत्य फेरीत

Patil_p

लाळबंदी नियमाचे सिबलीकडून उल्लंघन

Patil_p

ऍस्टन व्हिलाचे अवघ्या 9 मिनिटात 3 गोल!

Patil_p

हिमा दासला कोरोनाची बाधा

Patil_p

13 वर्षीय निशिया जपानची सर्वात तरुण सुवर्णकन्या

Patil_p
error: Content is protected !!