तरुण भारत

टी-20 विश्वचषक स्पर्धेतून फर्ग्युसन बाहेर

वृत्त संस्था/ शारजा

न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज फर्ग्युसन स्नायू दुखापतीमुळे आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेतून बाहेर फेकला गेला आहे. धोंडशिर दुखावल्याने तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही, अशी माहिती न्यूझीलंडच्या संघ व्यवस्थापनाने दिली आहे.

Advertisements

मंगळवारी पाकविरुद्ध पहिल्या सामन्यापूर्वी फर्ग्युसनची तंदुरूस्ती चाचणी घेण्यात आली. या चाचणीमध्ये तो तंदुरूस्त नसल्याचे आढळून आले. गेल्या सोमवारी सराव करत असताना 30 वर्षीय फर्ग्युसनची धोंडशिर दुखावली. ही दुखापत गंभीर स्वरूपाची असल्याने त्याला किमान चार आठवडे पूर्ण विश्रांतीची जरूरी आहे. न्यूझीलंडच्या 15 सदस्यीय संघात आता फर्ग्युसनच्या जागी ऍडम मिल्नेला स्थान दिले गेले आहे.

Related Stories

मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत आज उपांत्य सामने

Amit Kulkarni

जोकोविच उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

स्पेन, न्यूझीलंड उपांत्यपूर्व फेरीत

Patil_p

पूरनचा विंडीज अ संघात समावेश

Patil_p

कोलेस्निकोव्हचा नवा विश्वविक्रम

Patil_p

बटलरला चौथी कसोटी हुकणार

Patil_p
error: Content is protected !!