तरुण भारत

शरद पवारांचा दौरा तुर्तास रद्द

प्रतिनिधी/ सातारा

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होणारी बंडाळी थांबवण्यासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार हे साताऱयात रविवारी येणार होते, परंतु तो दौरा तुर्तास रद्द करण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसकडून देण्यात आली आहे. पवारसाहेब आल्यानंतरच कोणाचा अर्ज काढायला लावणार हे स्पष्ट होणार असल्याने त्यांच्या दौऱयापर्यंत इच्छुक उमेदवारांची धडधड वाढतीच राहणार आहे. अर्ज मागे घेण्यास बुधवारी प्रारंभ झाला असला तरी पहिल्या दिवशी कोणीही अर्ज मागे घेतला नाही. दरम्यान, जिल्हा बँकेत अध्यक्ष आमदार शिवेंद्रराजे हे आले होते. त्यांची जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी भेट घेतली. दरम्यान, बेँकेची दि. 29 रोजी शेवटची मासिक सभा असल्याने त्यामध्ये राजकीय बॉम्बच्या ठिकऱया उडण्याची दाट शक्यता आहे.

Advertisements

सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीमध्ये सध्या 217 अर्ज असून 131 जण निवडणुकीच्या रिंगणात आहेत. 21 पैकी 3 जागा बिनविरोध झालेल्या आहेत. अद्याप कोणाकोणाचे पॅनेल असणार हे निश्चित झाले नाही. परंतु राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत बंडाळी होवू नये यासाठी राष्ट्रवादीचे सुप्रिमो शरद पवार हे साताऱयात येणार होते. तुर्तास त्यांचा दौरा रद्द झाल्याचे राष्ट्रवादी कार्यालयातून सांगण्यात आले आहे. दरम्यान, जिह्यातील निर्णय हे विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सोपवल्याचे समजते. तर जिथे अडचण वाटेल तेव्हा बारामतीहून थेट फोनद्वारे मार्गदर्शन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून होणारी बंडाळी थांबवण्यासाठी खटपटी सुरु आहेत. रामराजेंच्याकडून प्रयत्न सुरु आहेत. पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडूनही राष्ट्रवादीचे प्राबल्य कसे राहिल यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा सुरु आहे. तर दुसऱया बाजूला भाजपाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि भाजपाचे आमदार जयकुमार गोरे यांनीही अर्ज भरले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून नेमकी काय दिशा असणार आहे. सत्ताधाऱयांना विरोध कसा असणार आहे याचाही उलघडा झालेला नाही.

आमदार शिवेंद्रराजे तब्बल एक तासभर जिल्हा बँकेत

जिल्हा मध्यवर्ती बँकेचे चेअरमन भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे हे थर गाडीतून जिल्हा मध्यवर्ती बँकेत बुधवारी आले होते. तब्बल दीड तास बँकेत होते. त्यांच्याशी चर्चा जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र गुदगे यांनी केली.

जिल्हा बँकेची शेवटची मासिक सभा दि. 29 रोजी

जिल्हा बँकेची शेवटची मासिक सभा दि. 29 राज्sााr होणार आहे. जिल्हा बेँकेच्या शेवटच्या मासिक सभेत नेमके कोणते फटाके फुटणार की नुसत्याच टीकल्या वाजणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.

Related Stories

”उद्धव ठाकरे यांचा कोकण दौरा म्हणजे नारळावर अक्षता टाकणं”

Abhijeet Shinde

बेळगावात बंद शांततेत; संमिश्र प्रतिसाद

Patil_p

गुरुवारी कोरोनाचे 966 नवे रुग्ण

Omkar B

निलजी ग्राम पंचायत निवडणुकीत नव्या चेहऱयांना संधी

Patil_p

मोटार सायकल चोरी प्रकरणी जोडगोळीला अटक

Rohan_P

थंडीमुळे रुग्णांच्या संख्येत वाढ

datta jadhav
error: Content is protected !!