तरुण भारत

सदरबाजारमध्ये दिवसभर तणाव

विटबंना झालेल्या मंदिरात सायंकाळी पार पडली महाआरती

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

यापूर्वी संवेदनशील असलेल्या सदरबाजारात हिंदूमुस्लिम समाज एकोप्याने गुण्यागोविंदाने रहातात. परंतु मंगळवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास दोन अल्पवयीन युवकांनी मंदिरात शिरुन बिटंबना केल्याचा प्रकार सकाळी उघडकीस येताच दिवसभर सदरबाजारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, दोन्ही समाजातील प्रमुखांशी पोलिसांनी चर्चा करुन वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. हिंदू समाजातील कार्यकर्त्यांनी संबंधित घटनेचा निषेध नोंदवत कारवाई करण्याची मागणी केली. सायंकाळी महाआरती करण्यात आली. दिवसभर मोठा पोलीस बंदोबस्त होता. सदरबाजार बंद ठेवण्यात आले होते.

सदरबाजारमध्ये हिंदू आणि मुस्लिम समाजाबरोबर इतर समाजही मोठय़ा संख्येने एकत्र गुण्यागोविंदाने राहतात. परंतु आजपर्यंत कधीही दोन्ही समाजात तेढ निर्माण होईल अशी घटना घडली नव्हती असे तेथील रहिवाशी सांगतात. परंतु त्याला छेद मंगळवारी रात्री लागला. मंगळवारी रात्री एका समाजातील दोन अल्पयवयीन युवकांनी मंदिराच्या गेटवरुन आतमध्ये जावून देवताच्या मूर्तीची विटंबना केली. हा प्रकार सकाळी जेव्हा मंदिरात भक्तगण गेले तेव्हा निदर्शनास आल्याने खळबळ उडाली. वातावरण चांगलेच तापले. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. मंदिर परिसरातील सीसीटीव्ही तपासणी केली असता दोन अल्पवयीन युवकांनी हे कृत्य केल्याचे निदर्शनास येताच पोलिसांनी त्या दोन युवकांना चौकशीकामी ताब्यात घेतल्याचे समजते. तसेच तक्रारही दाखल करण्यात आली आहे. कायदा व सुव्यवस्थेसाठी स्वतः पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी दोन्ही समाजातील प्रमुखांशी चर्चा करुन शांततेचे आवाहन केले. दिवसभर मात्र, तणावाचे वातावरण होते. सांयकाळी मूर्तीस अभिषेक घालण्यात आला. महाआरती करण्यात आली. यामध्ये भारत माता मंडळाचे कार्यकर्ते, तरुण वर्ग सहभागी झाला होता.

संबंधितावर कडक कारवाई करण्यात यावी

सीसीटीव्हीमध्ये घडलेला प्रकार कैद झाला आहे. यापूर्वी अशी घटना कधीही घडली नव्हती. आताच का घडली. या प्रकरणामध्ये मोठया व्यक्तींचा हात असण्याची शक्यता असून संबंधितांची चौकशी करुन कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भाजपा डॉक्टर सेलचे डॉ. उत्कर्ष रेपाळ यांनी केली आहे.

दोन्ही समाजाने सयंमाने घ्यावे

सातारा शहरात सदरबाजारमध्ये यापूवीं अशी घटना कधी घडली नव्हती. ही घटना दोन्ही समाजात तेढ निर्माण करणारी असून दोन्ही समाजाने सयंमाने घ्यावे. या घटनेचा निषेध मी करतो परंतु अशा घटना होवू नयेत म्हणून काळजी घेतली पाहिजे.

Related Stories

मालकापुरात पाच दिवस जनता कर्फ्यू

Abhijeet Shinde

सातारा : वेचले येथील उपकेंद्रात लसीकरणास प्रारंभ

datta jadhav

खोपोलीतील केमिकल कंपनीत भीषण स्फोट; दोन जणांचा मृत्यू

Rohan_P

सातारा : महामार्गावर बेलेवडे हवेली जवळ ऊस वाहतूक ट्रक्टर पेटला

Abhijeet Shinde

बार्शी तहसील कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर

Abhijeet Shinde

धामणी खोऱ्यातील वेतवडे पैकी भेंडाई धनगरवाडा गेली २१ दिवस अंधारात

Abhijeet Shinde
error: Content is protected !!