तरुण भारत

सोमवार पेठ पाण्याच्या टाकीखाली साकारली बाग

प्रतिनिधी/ कराड

गेली अनेक वर्षापासून सोमवार पेठेतील पिण्याच्या पाण्याच्या टाकीखालील जागा पडून होती. या जागेवर दारू अड्डा, पत्त्यांचे डाव रमायचे. त्याचा नागरिकांनाही याचा त्रास व्हायचा. येथील नगरसेवक सुहास जगताप व नगरसेविका विद्या पावसकर यांच्या संकल्पनेतून व नगरपालिकेच्या सहकार्यातून स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत प्रभागाला मिळालेल्या बक्षिसाच्या रकमेचा या बागेसाठी वापर करून या जागेत सुंदर बाग फुलवण्यात आली आहे. पर्यावरणाचा संदेश देणारी ही बाग नागरिकांसाठी ऑक्सिजन झोन ठरत आहे. या बागेत लहान मुलांसाठी खेळणी बसवण्यासाठी खासगी ट्रस्टच्या माध्यमातून सुहास जगताप यांनी अडीच लाख रूपयांचा निधी जमा केला आहे. 

Advertisements

कराड येथील सोमवार पेठेत असणाऱया पाण्याच्या टाकीखालील जागा रिकामी होती. या टाकीखाली आडोसा असल्याने या जागेचा गैरवापर होत असे. त्याचा त्रास परिसरातील नागरिक व महिलांना होत होता. नगरसेवक सुहास जगताप यांनी या जागेचा गैरवापर थांबवण्यासाठी व योग्य वापर होण्यासाठी कल्पना राबवून या जागेत बगीचा तयार करण्याचे ठरवले. त्यास नगरसेविका विद्या पावसकर यांनीही सहकार्य केले. त्यानुसार पालिकेच्या माध्यमातून सुंदर बगीचा तयार झाला आहे. 3 गुंठे जागेत आकर्षक कलाकुसर करून सुंदर बाग तयार करण्यात आली आहे. बागेतील भिंतीवर आकर्षक चित्रे काढण्यात आली आहेत. झाडांची विविध चित्रे काढून बिन झाडांचे जंगल तयार केले आहे. 2018 व 2019 मध्ये स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेअंतर्गत नगरपालिकेकडून प्रभाग स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. या स्पर्धेत नंबर मिळवून मिळालेल्या रकमेतून ही बाग फुलवण्यात आली. 

या  जागेत नगरपालिकेने ज्येष्ठ नागरिकांसाठी वॉकिंग ट्रक, बैठक व्यवस्था केली असून बागेत आकर्षक कारंजेही बसवले आहेत. बागेत लहान मुलांसाठी आकर्षक खेळणी बसवण्यात येणार आहेत. यासाठी सुहास जगताप यांनी ट्रस्टच्या माध्यमातून अडीच लाख रूपये निधी जमा केला आहे. 

सायंकाळच्यावेळी ज्येष्ठ नागरिकांसाठी ही बाग विरंगुळा झाली आहे तर लहान मुलांसाठी मनोरंजन झाले आहे. सुहास जगताप यांच्या संकल्पनेतून व त्यांच्या स्वःखर्चातून सोमवार पेठेतील नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी, यासाठी जुन्या काळातील रांजणाचा आकार देवून सोमवार पेठेत पाणपोई बसवण्यात आली आहे. जगताप यांनी आतापर्यंत अनेक सामाजिक उपक्रम केले असून कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर स्वःखर्चाने शहरात आवश्यकतेनुसार सॅनिटाईज फवारणी केली आहे. नागरिकांना दूध, भाजीपाला घरोघरी वाटप केले आहे. तसेच सोमवार पेठेत मोठय़ा बिल्डिंगमध्ये महत्वाचे फोन नंबरचे फलक लावले आहेत.

Related Stories

सातारा : गांधी मैदानावरचे हॉकर्स उद्या मुख्याधिकाऱ्यांना घालणार घेराव

datta jadhav

साताऱ्यात पूर्वप्राथमिक शिक्षिका, सेविका संघाचे थाळीनाद आंदोलन

datta jadhav

सातारा जिल्ह्यात आज 208 नागरिकांना दिला डिस्चार्ज

Abhijeet Shinde

कृषी सुधारणा विधेयक पुस्तिकेचे फडणवीस यांच्या हस्ते प्रकाशन

Abhijeet Shinde

सातारा जिल्हा अव्वल ठेवू

Patil_p

सातारा : उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आज मांडणार 307 कोटींच बजेट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!