तरुण भारत

लांजात शस्त्रधारी चोरटय़ांनी बंगला फोडला

माऊलीनगरमधील घरातील साहित्याची केली नासधूस

प्रतिनिधी/   लांजा

Advertisements

शहरातील रेस्टहाऊस परिसरातील माऊलीनगर येथे भरदिवसा शस्त्रधारी चोरटय़ांकडून बंगला फोडून नकली दागिने लंपास केले. मात्र घरातील साहित्याची नासधूस करत असतानाच तरुणांच्या सतर्कतेमुळे चोरांचा बेत फसला. त्यामुळे चोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला. ही घटना बुधवारी दुपारी 2 च्या दरम्यान घडली. स्थानिक तिघा तरुणांनी चोरटय़ांचा पाठलाग केल्याने चोरटय़ांनी तेथून पलायन केले. मात्र भरदिवसा घडलेल्या या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 लांजा रेस्टहाउस परिसरातील माऊलीनगर येथील मंगेश शांताराम सरदेसाई यांच्या ‘योगीराज’ नावाचा मालकीचा बंगला आहे. आजूबाजूला पुरंदरे व संजय विश्वासराव यांचे बंगले आहेत. पैकी पुरंदरे कुटुंब कायम मुंबईला वास्तव्याला असल्याने त्यांचा बंगला बंद असतो. देसाई यांच्या उजव्या बाजूला असलेल्या संजय विश्वासराव हे शिक्षक असल्याने ते शाळेत गेले होते. मंगेश देसाई आणि त्यांची पत्नी हे दोघे शिक्षक असल्याने ते दोघेही बुधवारी शाळेत गेले होते. तर त्यांचा मुलगा हा दुपारी 1 वाजेपर्यंत घरी होता. त्यानंतर तो घराबाहेर गेला होता. दोघेही शाळेत गेले होते. त्यामुळे घरात कोणीही नव्हते. याची संधी साधत बाईकवरून आलेल्या दोघा तरुण चोरटय़ांनी देसाई यांच्या बंगल्याच्या डाव्या बाजूला असलेला दरवाजा उचकटून आत प्रवेश केला. दोन्ही कपाटातील कपडे अस्ताव्यस्त फेकून देण्यात आले होते.

  आवाजामुळे तीन स्थानिक तरुण त्या दिशेने धावत गेले. एकाला पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचवेळी त्या चोरटय़ांपैकी एकाने आपल्या बॅगेतून रिल्व्हॉल्वर बाहेर काढले. त्यामुळे घाबरलेल्या तरुणांनी चोरटय़ाला सोडून दिले. त्यानंतर चोरटय़ांनी घटनास्थळावरून पळ काढला. मात्र तरुणांच्या सतर्कतेमुळे बंगल्यातील अन्य साहित्याची चोरी होता-होता वाचली आहे. दरम्यान सरदेसाई यांच्या घरातील लोखंडी तसेच 2 लाकडी कपाटे फोडून कपाटातील साहित्य अस्ताव्यस्त करत त्यामध्ये ठेवलेले नकली दागिने खरे असल्याचे समजून चोरून नेले. त्यांनी लगेच त्याच्या पुतण्याला व शेजारील अजून एका तरुणाला सोबत घेऊन त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता अज्ञात चोरटे दिसले. त्यांनी त्यांना आरडाओरडा करून हटकताच चोरटय़ांनी तेथून पळ काढला. अज्ञात चोरटे पल्सर दुचाकी घेऊन आले होते. घटनास्थळी दोन युवकांनी त्यांना हटकताच ही दुचाकी त्यांनी त्याच ठिकाणी टाकून पोबारा केला. मात्र या बंगला फोडीच्या घटनेत सोन्याचे दागिने किंवा रोख रक्कम चोरीला गेलेली नसल्याचे सांगण्यात आले. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच लांजा पोलिसांनी आजूबाजूच्या पोलीस स्थानकात खबर दिली असून चोरांना पकडण्यासाठी लांजा पोलीस कसोशीने प्रयत्न करीत आहेत. या घटनेची खबर लांजा पोलिसांना मिळाल्यानंतर चोरटे जंगल भागात पसार झाले असावेत, असा कयास काढण्यात आला आहे. सायंकाळी उशिरा लांजा पोलीस श्वानपथकाला पाचारण करणार होते.

दुचाकी तेथेच टाकून चोरटय़ांनी केले पलायन

चोरी करण्यापूर्वी या चोरटय़ांनी काही अंतरावर आपली दुचाकी उभी करून ठेवली होती. मात्र स्थानिक तरुणांनी या चोरटय़ांचा पाठलाग सुरू केल्याने चोरटय़ांनी आपली दुचाकी तेथेच टाकून पलायन केले. नंबर नसलेली ही बाईक नॉर्थ गोवा येथील आहे. त्यानंतर पुढे पळून जात असताना या चोरटय़ांनी येथील बांधकाम ठेकेदार ढेकणे यांच्या बांधकाम साईटवर उभी असलेली प्रमोद करंबेळे या कामगारांची बाईक घेऊन चोरटय़ांनी तिथून पळ काढला. भरवस्तीत व दुपारच्या वेळी घडलेल्या या घटनेने लांजा शहर परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

बोगस ई पासवर अनेक चाकरमानी गावी

NIKHIL_N

आफ्रिकेतील मालावी आंब्याला हापूस म्हणू नका

Patil_p

‘मरिन सेंच्युरी’मुळे मालवण विस्थापित होईल

NIKHIL_N

१८१ पास्ता, तेही २२० मिनिटांत

NIKHIL_N

चेकपोस्टवरील तपासणीत शिथिलता द्या

NIKHIL_N

कोरोना लसीकरणाचा खेळखंडोबा!

Patil_p
error: Content is protected !!