तरुण भारत

‘कोरे’ मार्गावर सोमवारपासून नवे वेळापत्रक

31 ऑक्टोबरला पावसाळी वेळापत्रक संपुष्टात

प्रतिनिधी/ खेड

Advertisements

कोकण मार्गावरून धावणाऱया रेल्वेगाडय़ांचे पावसाळी वेळापत्रक 31 ऑक्टोबरला संपुष्टात येणार आहे. 10 जूनपासून कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱया गाडय़ा ताशी 40 कि.मी.च्या वेगाने धावत आहेत. 1 नोव्हेंबरपासून ही मर्यादा संपुष्टात येणार आहे.

कोकण रेल्वेमार्गावर पावसाळ्यात रेल्वेगाडय़ा ताशी 40 च्या कि.मी. वेगाने चालवण्याचे निर्देश होते. या कालावधीत कोकण मार्गावर 24 तास वर्षागस्त सुरू होती. याशिवाय 681 कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

अतिसंवेदनशील ठिकाणी 24 तास गस्ती चौक्या उभारण्यात आल्या होत्या. आपत्कालीन संपर्कासाठी अपघात मदत मेडिकल व्हॅनमध्ये उपग्रह फोन संपर्कही प्रधान करण्यात आला होता. सिग्नलची दृश्यमानता सुधारण्यासाठी सर्व मुख्य सिग्नल एलईडी करण्यात आले होते. 31 ऑक्टोबरपासून कोकण रेल्वेगाडय़ांचे वेळापत्रक बदलणार असून 1 नोव्हेंबरपासून गाडय़ांचा वेग वाढणार आहे.

Related Stories

दापोलीत अद्याप 44 शाळा बंद

Abhijeet Shinde

दांडी येथून मासेमारी नौका गायब मच्छीमारांकडून शोधाशोध सुरू

NIKHIL_N

दापोली नगरपंचायतीवर परजिल्हय़ातील महिलांचा मोर्चा

Patil_p

पावसामुळे चिखलमय रस्त्याची नगराध्यक्षांकडून डागडुजी

NIKHIL_N

लॉकडाऊन संपेपर्यंत मंगळवारची कणकवलीत सर्व दुकाने बंद!

NIKHIL_N

धामापूर भायजेवाडी बंधाऱ्यात दोघांचा बुडून मृत्यू

Abhijeet Shinde
error: Content is protected !!