तरुण भारत

कळंगूटचे माजी भाजपा अध्यक्ष गुरुदास शिरोडकर यांचा भाजपला रामराम

प्रतिनिधी /म्हापसा

कळंगूट भाजपा माजी मंडळ अध्यक्ष तथा भाजपचे सक्रिय कार्यकर्ते गुरुदास शिरोडकर यांनी आपल्या पदाचा व भाजपचा प्राथमिक सदस्यपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्षाकडे सुपूर्द केला आहे.

Advertisements

1998 साली ते सदस्य झाले. गेल्या 23 वर्षाच्या कालावधीत त्यांनी अनेक पदे भूषविली पण 1999 साली भाजपने कळंगुटमध्ये प्रथम उमेदवार ठेवला तेव्हा त्याला निवडून आण्यासाठी निवडणूक एजंटही आपल्यास केल्याची माहिती त्यांनी दिली. प्रथम कोण कार्यकर्ते नव्हते तेव्हा पाच पंचायतीचा मतदारसंघ होता. प्रथम 1400 मते मिळाली. 2002 मध्ये पुन्हा निवडणूक लढविली. प्रत्येकवेळी निवडणुकापूर्ती सर्व येत होते नंतर गायब. मी तीनवेळा सरचिटणीस म्हणून धुरा सांभाळला. अध्यक्ष म्हणून दोनवेळा काम पाहिले. मला उमेदवाराची ऑफर आली पण मी नाकारली. त्यावेळी ती हेवी लढत झाली आम्हाला 5 हजार मते मिळाली मात्र आग्नेल फर्नांडिस निवडून आले. 2012 मध्ये मंत्री लोबोना तिकीट आली तेव्हा मीही निवडणूक एजंट होतो व ते निवडून आले. स्थानिक सरपंच जोसेफ सिक्वेरा यांचाही आम्हाला पाठिंबा मिळाला. 2012 साली लोकांच्या अपेक्षाही वाढल्या. मी पर्यटन संचालक झालो. स्वदेश दर्शन योजना अंतर्गत 50 कोटीच्या योजना आणल्या त्यावेळी पर्यटन मंत्र्यांशी त्यांचे वैरत्व होते.

आमच्या गावचे विषय होते. स्मशानभूमी प्रश्नी गाव एकत्र आला त्यावेळी आमदारांचा साथ आम्हाला मिळाला नाही. आपल्यावर दबाव आणला त्यासाठी मी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मागील साडेचार वर्षात भाजप कार्यकर्त्यांवर अन्याय झाला. शांतादुर्गा जागेत मलःनिस्सारण प्रकल्प आले ते काम बंद केले. शिवाजी महाराज स्मारक उभारण्यास अडथळा व लोकांची दिशाभूल. मतदारावर अन्याय अशा गोष्टी आमदारांनी केल्या. अशा आमदारांची साथ आपल्यास द्यायची नाही व भ्रष्टाचारी आमदाराबरोबर आपल्यास रहायचे नाही असे गुरुदास शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले. भ्रष्टाचारी भाजपला जनता धडा शिकविणार असे शिरोडकर म्हणाले.

Related Stories

मंत्री मायकल लोबो यांना काँग्रेसची तिकीट दिल्यास आम्ही त्यांच्याबरोबर राहणार नाही

Amit Kulkarni

मनपातर्फे मान्सूनपूर्व कामे युद्धपातळीवर

Omkar B

उमेश तळवणेकर यांचा राजीनामा

Patil_p

कपिलेश्वरी येथे युवतीचा विनयभंग हल्लाप्रकरणी युवकाला अखेर अटक

Patil_p

कोरोनाचा कहर : सहाजणांचा मृत्यू

Patil_p

राष्ट्रभक्तीची ज्योत जीवनात निर्माण झाल्यास प्रगती : किरण ठाकुर

Amit Kulkarni
error: Content is protected !!