तरुण भारत

कोविड लसीकरणाचा दुसरा टप्पा 15 नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करणार- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

म्हापशात नोकरी मेळाव्याचा शुभारंभ

प्रतिनिधी /म्हापसा

Advertisements

कोविड लसचा पहिला डोस गोव्याने 100 टक्के पूर्ण केला असून येत्या 15 नोवव्हेंबरपर्यंत दोन्ही डोस पूर्ण करण्याचे आमचे ध्येय आहे. यासाठी नागरिकांचे सहकार्य हवे असल्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. शिवाय गोवा स्वयंपूर्ण करण्यासाठी जनतेने सहकार्य करावे असेही ते म्हणाले.

काल बुधवारी स्वयंपूर्ण गोवा अंतर्गत कामगार खात्याच्या पुढाकाराने आसगाव म्हापसा येथील ज्ञानप्रसारक कॉलेजमध्ये नोकरी मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी व्यासपीठावर मंत्री जेनिफर मोन्सेरात, आमदार ग्लेन टिकलो, आमदार जोशुआ डिसोझा, डीएमसीचे चेअरमन श्रीकृष्ण पोकळे, कामगार आयुक्त राजू गावस उपस्थित होते. येत्या 10 व 11 नोव्हेंबरला श्यामा प्रसाद स्टेडियममध्ये राष्ट्रीय युवा संसदेचे आयोजन केले आहे. त्यात युवकांनी मोठय़ा संख्येने सहभाग घ्यावा. यावेळी राष्ट्रीय तसेच राज्यातील विषयांवर वादविवाद घडवून आणले जातील असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

मुख्यमंत्री म्हणाले की, लवकरच गोव्यात कौशल्य व डिझाईनिंग विद्यापीठ सुरू केले जाईल. भाजप सरकारने तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी विविध सरकारी योजना तसेच शिक्षणासाठी अनुदान देते. या नोकरी मेळाव्यात जवळपास 60 कंपन्यांचे प्रतिनिधींनी भाग घेतला आहे. तसेच 25 सरकारी खात्याचे स्टॉल्स लागले आहेत. अशावेळी युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा.

मंत्री जेनिफर मोन्सेरात म्हणाल्या की, अशा नेकरी मेळाव्यातून युवकांना विविध क्षेत्राशी निगडीत कंपन्यांबाबत माहिती मिळते व आयुष्यात नवीन दिशा मिळण्यासोबत रोजगाराची संधी मिळते. आमदार जोशुआ डिसोझा म्हणाले की, युवकाने प्रत्येकवेळी सरकारी नोकऱयांच्या मागे पळू नये. खासगी क्षेत्रात देखील अनेक संधी उपलब्ध असतात. सरकारी नोकऱयांसाठी अर्ज करण्यापूर्वी खासगी क्षेत्रात काम करावे व कामाचा अनुभव मिळवावा. खासगी क्षेत्रांमधूनच सरकारला महसूल मिळत असतो. त्यामुळे खासगी क्षेत्रालाही कुणीही कमी लेखू नये. असे आवाहन त्यांनी केले.

Related Stories

मांद्रे भूमिका स्पोर्ट्स क्लबतर्फे गांधी, शास्त्री जयंती

Amit Kulkarni

भाजप सरकारने गोव्याची स्थिती संघप्रदेशासारखी करून टाकली

Amit Kulkarni

गोव्यात नवे कर न लादता तीन योजना राबविणार

Amit Kulkarni

26 पर्यंत शाळा-कॉलेज बंद, रात्रीची संचारबंदी

Amit Kulkarni

मेळावलीत आंदोलक बनले सतर्क

Patil_p

उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनीही घेतली लस

Amit Kulkarni
error: Content is protected !!