तरुण भारत

वाळपई भाजपचे नेते सत्यविजय नाईक याचा आप पक्षात प्रवेश

प्रतिनिधी /वाळपई

वाळपई मतदारसंघातील भाजपचे नेते सत्यविजय नाईक यांनी अखेर आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीचे गणित बदलण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. सत्यविजय नाईक यांच्या समवेत अनेक भाजपा व इतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला.

Advertisements

 वाळपई मतदारसंघातील भाजपचे नेते सत्यविजय नाईक यांनी दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवार म्हणून काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारची टक्कर दिली होती. मंत्री विश्वजित राणे यांनी भाजप प्रवेश केल्यानंतर सत्यविजय नाईक यांचे वजन बऱयाच प्रमाणात कमी झाले होते. त्यामुळे राजकीय दृष्टिकोनातून त्यांनी अनेक पक्षांमध्ये प्रवेश करण्याच्या दृष्टीकोनातून चाचपणी सुरू केली होती. शेवटी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. दरम्यान, आज बुधवारी त्यांनी पक्षाचे सर्वेसर्वा तथा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत आम आदमी पक्षामध्ये प्रवेश केला. यामुळे वाळपई मतदारसंघातील राजकीय गणिते बदलण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. सत्यविजय नाईक यांनी दोनवेळा विधानसभा निवडणूक लढविली होती. यावेळी त्यांनी काँग्रेस पक्षाचे विश्वजित राणे यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले होते. मात्र विश्वजित राणे यांनी भाजपात प्रवेश केल्यापासून ते राजकीय स्थानाबाबत चिंताग्रस्त बनले होते. जवळपास चार महिन्यापासून त्यांनी भाजपा सोडण्याच्या दृष्टिकोनातून हालचाली सुरू केल्या होत्या. या संदर्भात त्यांनी अनेक पक्षांशी बोलणी सुरू केली होती. शेवटी आम आदमी पक्षामध्ये प्रवेश करण्याचा त्यांनी निर्णय घेतला व बुधवारी या संदर्भात प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक भाजपा कार्यकर्ते व इतर पक्ष कार्यकर्त्यांनी प्रवेश केल्याची माहिती हाती आली आहे. मात्र त्यांची निश्चित नावे अद्याप सापडली नाहीत.

Related Stories

काणकोणच्या किनारी भागाला वादळाचा तडाखा

Patil_p

राज्यात कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण 72 टक्के

Omkar B

आज गणेश पूजनाने चतुर्थी उत्सवास प्रारंभ

Patil_p

..एकदाच्या दहावीच्या परीक्षा झाल्या! पालक सुखावले, बालक बिनधास्त

Omkar B

पाच पालिकांचे भवितव्य आज

Amit Kulkarni

माशेल जन्क्शन रस्त्यावर जांभळीचे झाड कोसळले

Amit Kulkarni
error: Content is protected !!