तरुण भारत

खोल येथे ‘आमदार तुमच्या दारी’चा दुसरा टप्पा

नऊही वॉर्डांत फिरणार, नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद : कवळेकर

वार्ताहर /खोल

Advertisements

आमदार तुमच्या दारी अभियानाच्या अंतर्गत खोल पंचायत क्षेत्रातील शिरोटी, कामरमळे, वागोण भागांतील नागरिकांच्या घरोघरी भेटी घेऊन केपेचे आमदार तथा उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर यांनी त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. शिरोटी येथील श्री ग्रामदेव लक्ष्मीनारायण देवस्थानला उपमुख्यमंत्र्यांनी भेट देऊन श्रींचे आशीर्वाद घेतले. यावेळी देवस्थानचे अध्यक्ष पंढरी प्रभुदेसाई, सचिव संतोष कुलकर्णी, ऍटर्नी सुदेश प्रभुदेसाई यांनी त्यांचे स्वागत केले.

खोल पंचायत कार्यालयापासून हे दुसऱया टप्प्यातील अभियान राबविण्यात आले. त्यांच्यासमवेत सरपंच पूर्णा नायक, जिल्हा पंचायत सदस्य शाणू वेळीप, उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई, माजी जि. पं. सदस्य कृष्णा वेळीप, भाजप मंडळाचे सुनील पागी, रूपेश प्रभुदेसाई, प्रवीण प्रभुदेसाई, संतोष पागी, पंच गुरू वेळीप, अजय पागी, माजी पंच संतोष नाईक, नारायण वेळीप, प्रशांत प्रभुदेसाई, रघुनाथ खोलकर, सुदेश प्रभुदेसाई, विशाल खोलकर, लक्ष्मण उर्फ शाणू वेळीप, भिवा वेळीप, सत्यवान पागी, पंचायत क्षेत्रातील कार्यकर्ते व समर्थकांची उपस्थिती  होती.

शिक्षित युवकांना भेडसावणारी वाढती बेरोजगारी, कनेक्टिव्हिटी, प्रलंबित विकासकामे, पाणी समस्या आदी प्रश्न सोडविण्याचा आपला प्रयत्न चालू आहे. खोल पंचायत क्षेत्रात कोविड काळात अनेक विकासकामे खोळंबली असून ती मार्गी लावण्यात येतील. विधानसभा निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. मतदारसंघातील नागरिक आपल्या नेहमीच संपर्कात आहेत. मात्र निवडणुकीच्या काळात समस्या सविस्तरपणे समजून घेण्यासाठी आवश्यक अवधी मिळत नसल्यामुळे व मतदारसंघ मोठा असल्याने सध्या घरोघरी जाऊन नागरिकांच्या समस्या आपण जाणून घेत आहे, असे कवळेकर यांनी स्पष्ट केले. खोल पंचायत क्षेत्रात एकूण नऊ वॉर्ड आहेत. सर्व ठिकाणी आपण भेट देणार असून या भागातून आपणास उत्तम प्रतिसाद  मिळत आहे, असे त्यांनी सांगितले. खोल येथील ग्रामदेव लक्ष्मीनारायण देवस्थान ते कामरमळे व वागोण प्रभागाला जोडणाऱया पारंपरिक पायवाटेवरील जुना पदपूल जमीनदोस्त झाल्यास सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधी झाला आहे. शिमगोत्सवात तसेच श्री बेताळ देवस्थानच्या तिसाल उत्सवात याच पायवाटेचा वापर केला जातो. वागोण बसथांबा ते खोल देवस्थान यांच्यातील दुवा असलेला कामरमळे येथील पदपूल बांधण्याची मागणी कामरमळे येथील नागरिकांकडून याप्रसंगी करण्यात आली.

Related Stories

भाजपचाच पुन्हा पूर्ण बहुमताने विजय

Amit Kulkarni

सांखळी मतदारसंघात पावसामुळे पडझड सुरूच

Patil_p

पुरलेल्या मृतदेहाची अदलाबदल ?

Patil_p

गोवा डेअरीची रू.1 कोटी 35 लाखाची वसूली पंधरा दिवसात करा

Amit Kulkarni

काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवावी

Amit Kulkarni

स्वा.सै.गोपीनाथ मुळये निवर्तले

Amit Kulkarni
error: Content is protected !!