तरुण भारत

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावाच : आप

आंदोलनकर्त्या आप नेत्यांवर एफआयआर

प्रतिनिधी /पणजी

Advertisements

सत्ताधारी पक्षाकडून होत असलेला भ्रष्टाचार हा गोमंतकीय जनतेसाठी नवीन नाही. यापूर्वीही राज्यात भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर आली आहेत व त्यात मोठमोठय़ा नेत्याचा सहभाग असल्याचेही उघड झाले आहे. मात्र आता माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत याच्या संदर्भात केलेल्या आरोपामुळे गोव्यात संतापाची लाट पसरली आहे.

मलिक यांनी केलेल्या आरोपांची खरे तर चौकशी होणे गरजेचे आहे. परंतु  तशी  शक्मयता धूसर वाटते. याउलट सत्ताधारी पक्ष सत्यपाल मलिक यांना प्रतिसवाल करून मूळ विषयालाच बगल देत आहे, असा आरोप आम आदमी पार्टीचे राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी केला आहे.

सावंत सरकारने कोविड प्रश्न अत्यंत निष्काळजी आणि भ्रष्ट पद्धतीने हाताळला असा जाहीर आरोप मलिक यांनी केल्याने हे प्रकरण किती गंभीर आहे त्याला पुष्टी मिळते असे म्हांबरे म्हणाले.

राज्यपाल मलीक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे गोव्यातील भाजप सरकार भ्रष्ट असल्याची तक्रार केली होती. मात्र पंतप्रधानांनी संबंधितांवर कारवाई करण्याऐवजी राज्यपाल मलिक यांचीच गोव्यातुन उचलबांगडी केली. त्यामुळे गोव्यात सुरु असलेल्या भ्रष्टाचाराची पाळेमुळे किती खोलवर रुजली आहेत, याचा प्रत्यय येतो. यात सामान्य माणूस मात्र भरडला जात आहे, असे म्हांबरे यांनी सांगितले.

आक्रमक पद्धतीने रत्यावर उतरला आप

दरम्यान, या प्रकरणी एकीकडे अन्य राजकीय पक्ष केवळ निवेदने आणि प्रसार माध्यमांना मुलाखती देण्यात व्यस्त होते, त्यावेळी आम आदमी पक्ष आपली सर्व शक्ती पणाला लावून आक्रमक पद्धतीने रत्यावर उतरला.

राज्यातील सर्व भागातील आप चे कार्यकर्ते पणजीत दाखल झाले. परंतु आम आदमीचा आवाज दडपण्याचा प्रकार यावेळी करण्यात आला, असा आरोप ऍड. प्रतिमा कुतिन्हो यांनी केला.

आपनेच सर्वप्रथम प्रतिक्रिया जारी केली. दुसऱया दिवशी या विरोधात अधिक तीव्रतेने पक्षाने आजाद मैदानावर निदर्शने केली. त्यावेळी सुमारे 500 पेक्षा जास्त कार्यकर्ते एकत्र आले होते. त्यांना अडविण्यासाठी पोलीस बळाचा वापर करण्यात आला. अनेकांना धक्काबुक्की झाली तर अनेकांना लाठीचा मारही खावा लागला.  36 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तरीही आपने मनोधेर्य काय ठेवत पोलीस स्थानकातच गांधीगिरी स्टाईलने निदर्शने सुरूच ठेवली. दुसऱया दिवशी पहाटे पोलिसांनी त्याची सुटका केली, अशी माहिती कुतिन्हो यांनी दिली

या सर्व घडामोडीतून आम आदमी हा पक्ष आता भ्रष्ट राजकारण्यासाठी एक मोठे आव्हान ठरत असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी देखील गोमंतकीयांच्या प्रत्येक समस्येला वाचा फोडण्यासाठी आप खंबीरपणे सोबत उभा राहिला. मात्र आपली तत्वे आणि निष्ठेशी कधीही तडजोड केली नाही, अशी प्रतिक्रिया म्हांबरे यांनी व्यक्त केली.

’आप’ युथ विंगचे पणजीत आंदोलन

दरम्यान, माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेल्या गौप्यस्फोटानंतर प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ’आप’च्या युवा शाखेने पणजीत निदर्शने केली. मंगळवारी करण्यात आलेले आंदोलन दडपण्यासाठी पोलीस बळाचा वापर करून ’आप’च्या कार्यकर्त्यांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतले असा आरोप त्यांनी केला.

मलिक यांनी सावंत सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची न्यायालयीन चौकशी करावी, अशी मागणी आपने कायम ठेवली आहे. गोवा सरकारात पावलोपावली भ्रष्टाचार आहे, असे मलिक यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. त्यांच्या अशा स्पष्टवक्तेपणामुळेच त्यांना पदावरून हटवण्यात आले होते, असा आरोपही करण्यात आला.

आम आदमी पक्षाने मंगळवारी 800 स्वयंसेवकांसह आंदोलन केले होते. त्यातून भाजपला हादरा बसला होता. म्हणुनच पोलिसांनी अनेक आप नेते कार्यकर्त्यांना मारहाण केली. 27 ऑक्टोबरच्या पहाटेपर्यंत त्यांना बेकायदेशीरपणे पोलीस स्थानकात ठेवण्यात आले असा आरोपही युवा विंगने केला. आप नॅशनल युथ विंग आणि ताळगावच्या प्रभारी सेसिल रॉड्रिग्स, यांनी सांगितले की, गोमंतकीय सध्या भ्रष्ट भाजप सरकारला कंटाळले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, यावर ते ठाम आहेत. मुख्यमंत्री सावंत राजीनामा देत नाहीत तोपर्यंत ’आप’ थांबणार नाही! असे आप युवा महासचिव हॅन्झल फर्नांडिस यांनी सांगितले.

Related Stories

खाण कर्मचाऱयांचा प्रश्न तीन महिन्यांत सोडवा

Patil_p

‘लोकमान्य’मध्ये गुंतवणूकदारांना मोठी संधी

Omkar B

मुरगाव पोलिसांकडून चोरीचा छडा, चौघांना अटक

Omkar B

सिटी स्कॅनसाठी फोंडय़ातील सामान्य रुग्णांना भुर्दंड

Omkar B

मुंबईत अडचणीच्या ठिकाणी आग विझवण्यासाठी लवकरच फायर बाईक

Abhijeet Shinde

स्वार्थासाठी पक्षांतरे करणाऱया गद्दारांना अद्दल घडवा

Patil_p
error: Content is protected !!