तरुण भारत

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचे विमानतळावर स्वागत

प्रतिनिधी /वास्को, पेडणे

उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचे काल गोव्यात आगमन होताच दाबोळी विमानतळावर राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्ले, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, शिष्टाचारमंत्री माविन गुदिन्हो यांनी त्यांचे स्वागत केले. दाबोळीच्या आयएनएस हंस तळावर यावेळी मुख्य सचिव परीमल रॉय, भारतीय नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी ऍडमिरल फिलीपोस जॉर्ज पायनुमुटील, पोलीस उपमहासंचालक मुकेश कुमार मीना, सचिव व्हाय. व्ही. व्ही. जे. राजेशेखर, दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी रुचिका कटीयाल व इतर मान्यवर उपस्थित होते.

Advertisements

संकुलाचे आज उद्घाटन

विर्नोडा-पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये सरकारी  महाविद्यालय संकुलाचे आज गुरुवारी 28 रोजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू  यांच्या हस्ते उद्घाटन  होणार आहे.

विर्नोडा-पेडणे येथील संत सोहिरोबानाथ आंबिये महाविद्यालयाचे सुसज्ज असे संकुल उभारले आहे. उद्घाटन सोहळय़ाला प्रमुख पाहुणे म्हणून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, खास निमंत्रित पाहुणे राज्यपाल श्रीधरन पिल्लई,  निमंत्रित पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, उपमुख्यमंत्री मनोहर आजगावकर,  मांदे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे, राज्याचे मुख्य सचिव परिमल राय, विर्नोडा सरपंच अपर्णा परब आदी उपस्थित राहतील. उद्घाटन सकाळी 10.30 ते सकाळी 11.45 या दरम्यान चालणार आहे. कार्यक्रमाला निमंत्रित व्यक्तींनाच प्रवेश असून हा कार्यक्रम सव्वा तास चालणार आहे.

Related Stories

शनिवारी कोरोनाचे आठ बळी

Patil_p

अंजुणे धरणाच्या उपकालव्यांची दुरुस्ती सुरू

Patil_p

कुडचडेतील काँग्रेस कार्यकर्त्यांचा ‘आप’मध्ये प्रवेश

Amit Kulkarni

गुडे पाठोपाठ ओशेलात पाण्याची टंचाई

Patil_p

प्रतिज्ञापत्र सादर करा

Amit Kulkarni

वाळपई नगरपालिका मंडळाच्या कारभारावर समाधान

Patil_p
error: Content is protected !!