तरुण भारत

राज्य सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करावी

गोवा फॉरवर्डची राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पत्राद्वारे मागणी

प्रतिनिधी /मडगाव

Advertisements

मेघालयच्या राज्यपालांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केल्यानंतर गोवा फॉरवर्ड पक्षाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पत्र लिहून गोवा सरकार बरखास्त करण्याची आणि राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली आहे. गोव्याला भ्रष्टाचारापासून वाचवण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

संवैधानिक संस्थांवरील जनतेचा विश्वास जाण्याच्या अगोदर आणि आमच्या अभिमानास्पद राज्याची बदनामी होण्यापासून वाचवण्यासाठी ही कारवाई आवश्यक आहे, असे गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी म्हटले आहे. मेघालयाचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या सूचक आरोपानंतर गोव्याच्या सरकारने सत्तेत राहण्याचे सर्व नैतिक आणि राजकीय अधिकार गमावला आहे. तसेच गोव्यातील लोकांवर राज्य करण्याचा विशेषाधिकारही भाजप सरकारला नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

सत्यपाल मलिक यांनी राज्यपाल म्हणून गोव्यातही सेवा बजावली होती आणि भाजप सरकारच्या गैरकारभार व भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवल्यानंतर त्यांची बदली करण्यात आली होती. विजय सरदेसाई यांनी वारंवार भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविला होता आणि राज्यपालांच्या नजरेस ते आणून दिले होते, याकडे लक्ष वेधण्यात आले आहे. सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रीय दूरचित्रवाणी वाहिनीवरील मुलाखतीत गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर आणि सरकारवर गंभीरपणे केलेले भ्रष्टाचाराचे आरोप लोकांनी बघितले आहेत. त्यांनी सत्यकथन केले आहे. प्रमोद सावंत सरकारने सर्व स्तरांवर केलेला भ्रष्टाचार त्यांनी उघड केला आहे, असे या पत्रात म्हटले आहे.

सावंत यांच्याकडून जनतेचा अपमान

आपल्या महान लोकशाही देशाच्या इतिहासात प्रथमच विद्यमान राज्यपालाने कोणताही संकोच किंवा शंका न ठेवता असे प्रतिपादन केले आहे की, विद्यमान मुख्यमंत्री आणि त्यांचे सरकार भ्रष्ट व्यवहार आणि चुकीच्या कृत्यांमध्ये गुंतलेले आहे. विशेषतः कोविड-19 महामारीच्या लॉकडाऊन कालावधीतही त्यांनी असे कृत्य केले आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी केवळ राज्यातील जनतेचाच नव्हे, तर देशातील जनतेचा अपमान केला आहे, असे पुढे म्हटले आहे. गोवा हे छोटे राज्य आहे, पण आम्हाला आमच्या राज्याचा अभिमान आहे. आमचा स्वाभिमान आणि सन्मान हे अविभाज्य आहेत. गोवा फॉरवर्ड हा गोव्यातील एक कर्तव्यदक्ष आणि सजग विरोधी पक्ष म्हणून गोव्याच्या सरकारची गैरकृत्ये नियमितपणे उजेडात आणत आला आहे. अशी अनेक प्रकरणे पाठपुरावा करून भारतीय राज्यघटनेनुसार आणि कायद्याचा आधार घेवून तार्किक अंतापर्यंत पोहोचविली आहेत, असे पत्रात म्हटले आहे.

Related Stories

आयआयटी प्रकल्प मेळावलीतून तात्काळ हटवा !

Patil_p

सीझेडएमपी जनसुनावणी रद्द करण्यात यावी ः अभिजीत प्रभुदेसाई

Amit Kulkarni

प्रो. फुटबॉल स्पर्धेत चर्चिल ब्रदर्स क्लब-यूथ मानोरा बरोबरीत

Amit Kulkarni

सुनंदाबाई बांदोडकर हायस्कूलला आग

Patil_p

खांडेपार येथील नक्कल पाणी प्रकल्प बेकायदा

Amit Kulkarni

हणजूण येथे रेव्ह पार्टीवर सीआयडीचा छापा

Patil_p
error: Content is protected !!