तरुण भारत

केदनूर येथील प्रणल तोलेकर ठरला कलाश्री बंपर लकी ड्रॉ चा विजेता

रेनोल्ड क्वाईड कारचे मिळाले बक्षीस : नवीन सभासद नोंदणी सुरू

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

कलाश्री बंब आणि स्टील फर्निचरच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त लकी बंबर ड्रॉ काढण्यात आला आहे. त्यामध्ये केदनूर येथील प्रणल मारुती तोलेकर हे रेनोल्ड क्वाईड कारचे विजेते ठरले आहेत. तसेच 50 ते 100 सभासदांची नोंद झाल्याबद्दल लकी ड्रॉ काढण्यात आला. त्यामध्ये महालक्ष्मी ग्रुप तोपिनकट्टी सोसायटीचे विठ्ठल हलगेकर हे टिव्हीएस एक्सलचे विजेते ठरले.

ज्या डिलर्सनी 25 ते 49 सभासदांची नोंद केलेल्या गटामध्ये सुनिता सुळगेकर या 5 हजार रुपयांच्या विजेत्या ठरल्या. कलाश्रीच्या नवीन योजनेंतर्गत 10 हजार रुपये गुंतवा व बारा हजार रुपयांचे किराणा सामान किंवा फर्निचर प्रति महिना रुपये 1 हजारचे 12 महिन्यांपर्यंत खरेदी करता येवू शकते.

तिसऱया भव्य बक्षीस योजनेसाठी नाव नोंदणी सुरू

कलाश्रीची तिसऱया भव्य बक्षीस योजनेसाठी नाव नोंदणी सुरू झाली आहे. 600 रुपये प्रतिमहिना भरून लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्याची संधी कलाश्री देत आहे. लकी ड्रॉच्या कार्यक्रमावेळी कलाश्री बंबचे संचालक प्रकाश डोळेकर, बँक ऑफ महाराष्ट्राचे व्यवस्थापक अनिल बारटक्के, खादरवाडी येथील देवस्थान ट्रस्टचे चेअरमन रमेश पवार, जय भारत सोसायटीचे चेअरमन बी. आय. नेसरकर, नगरसेवक रमेश मैल्यागोळ, शरद पाटील आदी उपस्थित होते.

Related Stories

खानापूर तालुका म. ए. समितीच्या दोन्ही गटांनी ऐक्य साधावे

Amit Kulkarni

शेकडो गवंडी-बडग्यांनी धरली रोहयोची वाट

Omkar B

भावपूर्ण वातावरणात सुरेश अंगडी यांना श्रद्धांजली

Patil_p

सिडी खराब, सांडपाणी रस्त्यावर

Amit Kulkarni

वृद्धाचा कोरोना वॉर्डमध्ये तडफडून मृत्यू

Patil_p

शेतकऱयांचा महामार्ग रोखण्याचा प्रयत्न

Amit Kulkarni
error: Content is protected !!