तरुण भारत

काँक्रिटीकरणाचे काम ठप्प, यंत्रोपकरणे जागेवर

मंडोळी रोडचे काम अर्धवट : स्मार्ट सिटी कंपनीच्या दुर्लक्षाचा स्थानिक रहिवाशांना फटका : रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार ?

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

स्मार्ट सिटी योजना राबविण्यासाठी प्रायोगिक तत्त्वावर स्मार्ट रस्ता निर्माण करण्याकरिता मंडोळी रोडची निवड करण्यात आली. पण पाच वर्षे उलटली तरी रस्त्याचे काम अद्यापही अर्धवटच आहे. येथील अर्धवट असलेल्या रस्त्यांमुळे आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या दुर्लक्षाचा फटका स्थानिक रहिवाशांना बसत आहे. आणखीन किती दिवस अडचणीतून जायचे, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित करण्यात येत आहे.

स्मार्ट सिटी योजनेसाठी शहराची निवड झाल्यानंतर स्मार्ट रस्ते करण्यासाठी मंडोळी रोड आणि शिवबसवनगर येथील रस्त्याची निवड करण्यात आली. या दोन्ही रस्त्याकरिता 25 कोटीच्या निधीची तरतूद करून स्मार्ट सिटी योजनेतील कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. सुरुवातीलाच हाती घेण्यात आलेल्या रस्त्याचा विकास ठप्प झाला आहे. मंडोळी रोडच्या रस्त्याचे एका बाजूने काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. पण दुसऱया बाजूचे काम तीन वर्षांपर्यंत रखडले होते. ठिकठिकाणी खोदण्यात आलेले खड्डे, चरी व रस्ते वाहनधारकांसह स्थानिक रहिवाशांना त्रासदायक बनले आहेत. स्थानिक रहिवाशांना ये-जा करण्यासाठी तात्पुरता रस्ता करण्यात आला आहे. पण दुसऱया बाजूच्या रस्त्याचे काँक्रिटीकरण अद्याप पूर्ण झाले नाही. काँक्रिटीकरणासाठी आणलेली यंत्रोपकरणे रस्त्यावर पडून गंजत आहेत. पण रस्त्याचे काम पूर्ण झाले नाही. तर या ठिकाणी रस्ता अर्धवट असल्याने अपघात घडत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम कधी पूर्ण होणार, असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.

उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ा वाहनधारकांना धोकादायक

ठिकठिकाणी उघडय़ावर असलेल्या लोखंडी सळय़ा अपघातास निमंत्रण देत आहेत. काही ठिकाणी फुटपाथचे काम अर्धवट असून फुटपाथवर गवत उगवले असून गटारीच्या चेंबरवर आणि डक्ट उघडे असल्याने वाहनधारकांना धोकादायक बनले आहे. ठिकठिकाणी अशा डक्ट उघडय़ा असल्याने नागरिकांना धोका निर्माण झाला आहे. निर्माण झालेल्या अडचणींचे निवारण कधी होणार, असा प्रश्न येथील रहिवासी उपस्थित करीत आहेत.

स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे रस्त्याच्या पूर्ततेसाठी नागरिकांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. पण याची दखल घेतली जात नाही. अधिकाऱयांच्या बेजबाबदार आणि दुर्लक्षामुळेच रस्त्याचा विकास ठप्प झाला आहे, असा आरोप नागरिक करीत आहेत.

Related Stories

विहिरीत पडलेल्या तरुणाचा मृतदेह आढळला

Omkar B

मासगौंडहट्टी खूनप्रकरणी आरोपीला जन्मठेप

Amit Kulkarni

सांबरा रोडवर दरोडय़ाच्या तयारीत असलेल्या त्रिकुटाला अटक

Rohan_P

नवीन शैक्षणिक धोरण क्रांती घडविणारे

Amit Kulkarni

बेळगावात घरफोडय़ा करणाऱया जोडगोळीला अटक

Amit Kulkarni

रेल्वे कर्मचाऱयांच्या चुकीचा प्रवाशांना फटका

Amit Kulkarni
error: Content is protected !!