तरुण भारत

खासबाग येथील चौकात जलवाहिनीला गळती

नगरसेवक रवि साळुंखे यांच्या पाठपुराव्यानंतर दुरुस्ती

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

एलऍण्डटी कंपनीच्यावतीने जलवाहिन्या घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खासबाग येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जलवाहिन्या घालताना जुन्या वाहिनीचे नुकसान झाल्याने गळती लागली होती. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागले.त्यामुळे नगरसेवक रवि साळुंखे यांनी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे पाठपुरावा करून जलवाहिनीचे निवारण केले.

शहरात 24 तास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जलवाहिन्या घालण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. याअंतर्गत शहापुरसह विविध परिसरात जलवाहिन्या घालण्यात येत आहेत. सदर जलवाहिन्या घालताना सध्या पाणी पुरवठा करण्यात येणाऱया जलवाहिनीचे नुकसान झाले. सदर ठिकाणी खड्डा खोदून ठेवण्यात आला, मात्र दुरूस्ती करण्यात आली नाही.

त्यामुळे परिसरातील पाणी पुरवठा ठप्प झाला होता. त्यामुळे सदर जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी नगरसेवक रवि साळुंखे यांनी एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे पाठपुरावा कुरून दुरूस्तीचे काम पूर्ण करून घेतले.

Related Stories

ऑनलाईन बसपास प्रक्रिया विद्यार्थ्यांना ठरतेय डोकेदुखी

Omkar B

मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण

Patil_p

कंग्राळी बुद्रुक येथील दसरोत्सव साधेपणाने

Patil_p

बेळगाव शैक्षणिक जिल्हय़ाचा पीयुसीचा निकाल 23.92 टक्के

Amit Kulkarni

खासबागचा आठवडा बाजार सलग तिसऱया रविवारीही बंद

Patil_p

बिजगर्णी, बेळवट्टीसह इतर ग्रा.पं.ची आज मतमोजणी

Amit Kulkarni
error: Content is protected !!