तरुण भारत

पाच लाखांच्या ऐवजावर चोरांचा डल्ला

निपाणी, गायकवाडी येथील घटना :सोन्यासह प्रापंचिक साहित्य लंपास शहर व ग्रामीण पोलिसात घटनांची नोंद : नागरिकांत भीतीचे वातावरण

प्रतिनिधी /निपाणी

Advertisements

निपाणीतील हनुमाननगर व गायकवाडी येथील बंद घरांना चोरटय़ांनी लक्ष करत सोने व रोख रकमेवर डल्ला मारल्याचे प्रकार बुधवारी उघडकीस आले आहेत. या घटनांमध्ये चोरटय़ांनी 8 तोळे सोने तर 90 हजारांची रोकड लंपास केली. तसेच संसारोपयोगी साहित्यावरही डल्ला मारला आहे. या घटनांमुळे नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. घटनास्थळांना पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला आहे.

निपाणीतील हनुमाननगरात बेबीजान मिलनसाहेब गुंजाळे यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून एक तोळे सोन्यासह रोख रक्कम, प्रापंचिक साहित्य असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. सदर घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. त्यामुळे हनुमाननगरसह परिसरात नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

याबाबत घटनास्थळावरून समजलेली माहिती अशी की, सदर घर मालकीन बेबीजान या विवाह समारंभासाठी तारळे (ता. राधानगरी) या गावी गेल्या होत्या. बुधवारी सकाळी गुंजाळे यांच्या शेजाऱयांना घराचा कोयंडा तोडल्याचे लक्षात आल्याने त्यांनी ही माहिती गुंजाळे यांना फोनवरून दिली. त्यानंतर गुंजाळे या बुधवारी सकाळी 11 वाजता घरी पोहोचल्या. चोरटय़ांनी तिजोरीतील एक तोळय़ाची सोन्याची अंगठी, रोख पन्नास हजार रुपये तसेच पितळेचा हंडा, तांब्याची घागर, पितळी डबे, तांबे, समया असा एकूण सव्वा लाखाचा ऐवज चोरटय़ांनी लंपास केला. सदर घटनेची माहिती मिळताच निपाणी शहर पोलीस ठाण्यातील हवालदार के. बी. दडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. अधिक तपास निपाणी शहर पोलीस उपनिरीक्षक कृष्णवेणी गुर्लहोसूर करत आहेत.

गायकवाडी (ता. निपाणी) येथे दोन वेगवेगळय़ा ठिकाणी चोरटय़ांनी बंद घरे फोडून सोन्यासह चार लाखाचा ऐवज लंपास केला. आप्पाजी शेंडगे यांच्या घरातून सात तोळे सोने रोख चाळीस हजार रुपये चोरटय़ांनी लंपास केले. तर दुसऱया घटनेत सिद्धाप्पा कुशाप्पा लांडगे यांच्या घरातील टीव्ही संच असा एकूण चार लाखांच्या ऐवजावर चोरटय़ांनी डल्ला मारला आहे. सदर घटनेची माहिती समजताच निपाणी ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळांना भेट देऊन पंचनामा केला आहे. अधिक तपास ग्रामीणचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार करत आहेत.

सतर्क राहण्याचे आवाहन

सध्या दिवाळी सणाचा कालावधी सुरू होत आहे. त्यामुळे नागरिकांकडे पैसा व सोने असणार याचा ठाव घेत चोरटे लक्ष ठेऊन डल्ला मारत आहेत. रात्रीच्यावेळी कोणत्याही प्रकारचा आवाज अथवा प्रकार घडल्यास दरवाजा उघडू नये, सतर्कता बाळगत शेजारच्या नागरिकांना सदर प्रकाराची माहिती देत पोलिसांना फोनवरून संपर्क साधावा. चोरटय़ांना जेरबंद करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करणे गरजेचे आहे.

Related Stories

जुगारी अड्डय़ावर छापा; 11 जणांना अटक

Amit Kulkarni

अनगोळ येथे विकेंड लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी

Patil_p

राकसकोप जलाशयामध्ये 33 दिवस पुरेल इतका पाणीसाठा

Patil_p

‘गुरुदत्त’तर्फे कोरोना लसीकरणासाठी मदत

Patil_p

किणये येथे बालिकांनी साकारल्या नवदुर्गा

Amit Kulkarni

उद्यमबाग येथील एफएल एक्स्पर्ट येथे रोग प्रतिकार शक्तीवर्धक गोळय़ांचे वाटप

Patil_p
error: Content is protected !!