तरुण भारत

कर वसूल करून कामगारांचे वेतन द्या

जिल्हा पंचायतीचे अधिकारी बसवराज हेग्गनाईक यांची पीडीओंना सूचना

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

बेळगाव तालुक्मयातील अनेक कर्मचाऱयांचे वेतन थकीत ठेवण्यात आले होते. त्यामुळे अनेक कर्मचाऱयांच्या जगण्याचा प्रश्न ऐरणीवर आला होता. त्यामुळे याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ग्रामपंचायत कर्मचाऱयांनी जिल्हा पंचायतचे अधिकारी बसवराज हेग्गनाईक यांच्याकडे केली होती. याची दखल घेत त्यांनी तातडीने पीडीओ व ग्रामपंचायत कर्मचाऱयांची बैठक घेऊन यासंबंधी माहिती जाणून घेतली. ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील करवसुली करून येत्या महिन्याभरात थकीत वेतन देण्याच्या सूचना केल्या आहेत.

तालुका पंचायतच्या महात्मा गांधी सभागृहात तातडीची बैठक घेऊन त्यांनी वरील सूचना केल्या आहेत. व्यासपीठावर तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी राजेश दनवाडकर होते. हेग्गनाईक यांनी अनेक कर्मचारी वेतनाविना काम करत आहेत. जर पीडीओंचेच वेतन थांबले असता तर काय केला असता, असा सवाल उपस्थितीत करत तातडीने वेतन देण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

मागील दोन ते तीन वर्षांपासून अनेक ग्रामपंचायत कर्मचारी वेतनापासून वंचित आहेत. यामध्ये क्लार्क, शिपाई, संगणक ऑपरेटर व इतर कर्मचाऱयांचा समावेश आहे. ग्रामपंचायतमधील कर वसूल करून त्यांना वेतन देण्यासाठी का प्रयत्न करण्यात येत नाही, असा सवाल उपस्थित करण्यात आला. यासाठी संबंधित कर्मचाऱयांनीही प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. तेव्हा तातडीने कर गोळा करून वेतनाची व्यवस्था करण्याचे आवाहन करण्यात आले.

ग्रामपंचायत कर्मचाऱयांचे वेतन पीडीओंकडून करण्यात येते. मात्र अनेक पीडीओंनी संबंधितांकडे दुर्लक्ष केले होते. अशी तक्रार करण्यात आली होती. याकडे गांभीर्याने लक्ष देऊन त्यांनी अनेक पीडीओंना धारेवर धरले. मागील दीड ते दोन वर्षांपासून ग्रामपंचायत कर्मचाऱयांचे वेतन होत नाही, याला जबाबदार कोण? तातडीने वेतन देण्यासाठी कर गोळा करण्याची सूचना केली. याचबरोबर कर गोळा करून तो विकासासाठी किंवा इतर कामांसाठी उपयोग करून घ्या, अशी सूचनाही त्यांनी केले.

Related Stories

देवदर्शनांवर सध्या प्रतिबंध

tarunbharat

विद्यार्थ्यांसाठी एसएसएलसीचा टप्पा भविष्यासाठी महत्वाचा

Patil_p

वडगाव यात्रा काळातील पाचव्या गुळ्ळवा मूर्तीचे पूजन

Amit Kulkarni

क्लिनिकल बायोमार्कर सेंटरचे केएलईमध्ये आज उद्घाटन

Amit Kulkarni

व्हॅक्सिनचा हवाई प्रवास

Amit Kulkarni

अतिथी शिक्षकांची नियुक्ती प्रक्रिया जैसे थे

Omkar B
error: Content is protected !!