तरुण भारत

सात सफाई कर्मचारी कुटुंबांना हक्कपत्रांचे वितरण

जिल्हाधिकारी कार्यालयात झाली बैठक : इतर कुटुंबांनाही लवकरच हक्कपत्रे दिली जाणार, एकूण 246 जणांना नोटिसा पाठविण्यात येणार

प्रतिनिधी /बेळगाव

Advertisements

सफाई कर्मचारी कुटुंबांना घरांची हक्कपत्रे देण्याची मागणी वारंवार करण्यात आली. त्याची दखल जिल्हाधिकाऱयांनी घेतली व स्वाक्षरी करून बुधवारी 7 कुटुंबांची हक्कपत्रे मनपा आरोग्याधिकाऱयांकडे दिली. जिल्हाधिकारी कार्यालयात सफाई कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱयांची बैठक घेतली. त्यामध्ये ही हक्कपत्रे देण्यात आली.

सफाई कर्मचाऱयांच्या समस्यांबाबत जिल्हाधिकाऱयांनी बैठक घेतली. यावेळी इतर सफाई कर्मचाऱयांच्या कुटुंबांनाही घरांची हक्कपत्रे दिली जाणार आहेत. मात्र याबाबत प्रथम त्यांना ज्या ठिकाणी घर हवे आहे, त्याची माहिती घेण्यासाठी नोटीस बजावण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. शहापूर येथील आनंदवाडी येथे घर हवे की गृहभाग्य योजनेमध्ये आझमनगर किंवा रुक्मिणीनगर येथे याची माहिती घेतली जाणार आहे, असे जिल्हाधिकाऱयांनी सांगितले.

एकूण 246 लोकांना याबाबत नोटिसा पाठवून देणार असल्याचे सांगण्यात आले. दहा दिवसांमध्ये त्या नोटिसीला संबंधितांनी उत्तर द्यायचे आहे. 172 जणांना आझमनगर येथे तर रुक्मिणीनगर येथे 120 जणांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यावेळी व्हिजिलन्स मॉनिटरी कमिटीचे सदस्य दीपक वाघेला आणि विजय निरगट्टी यांनी सफाई कर्मचाऱयांना ओळखपत्रे देण्याची मागणी केली.

जिल्हाधिकाऱयांनी याबाबत सरकारकडे पाठपुरावा करून ओळखपत्रे दिली जातील, असे आश्वासन दिले. मात्र यावेळी उपस्थित असलेल्या सदस्यांनी बळ्ळारी महानगरपालिकेमध्ये देण्यात आलेली प्रमाणपत्रे दाखविली. तशाच प्रकारे सध्या सफाई कर्मचाऱयांना प्रमाणपत्रे द्यावीत, असे आदेश जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना दिले आहेत. निवृत्त सफाई कर्मचाऱयांच्या पेन्शनमधून घरांचे भाडे घेतले जात आहे, ते थांबवावे, अशी मागणीही केली.

नोकरीत कायम करण्याबाबत चर्चा

सफाई कर्मचाऱयांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी पूर्वी नोकरीत सामावून घेण्यास स्थगिती देण्यात आली होती. मात्र आता स्थगिती उठविली असून तातडीने कायमस्वरुपी नोकरीत सामावून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकाऱयांनी ज्ये÷तेनुसार प्राधान्य देण्याची सूचना केली आहे. सफाई कर्मचाऱयांना नोकरीत कायमस्वरुपी सामावून घेण्यासाठी अधिकारी आणि कंत्राटदार 70 ते 80 हजार रुपये मागणी करत आहेत. मात्र कोणीही सफाई कर्मचाऱयांनी ही रक्कम देऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी शिष्यवृत्ती देण्याचे आदेश

सफाई कर्मचाऱयांच्या मुलांना सॅनिटरी इन्स्पेक्टरचे शिक्षण देण्यासाठी 24.10 या वित्त आयोगातून शिष्यवृत्ती द्यावी, अशी मागणी दीपक वाघेला व विजय निरगट्टी यांनी केले. त्यावर जिल्हाधिकाऱयांनी महापालिकेच्या अधिकाऱयांना तातडीने संबंधित मुलांना शिष्यवृत्ती द्यावी, असा आदेश बजावला आहे.

या बैठकीला महापालिका आयुक्त रुदेश घाळी, पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा, सफाई कर्मचारी अभिवृद्धी निगमचे बुजबळी, महापालिका आरोग्याधिकारी संजीव डुमगोळ यांच्यासह व्हिजिलन्स मॉनिटरी कमिटीचे शिवगोळ व इतर अधिकारी उपस्थित होते.

मनपा अधिकाऱयांविरोधात गंभीर आरोप

महापालिकेचे अधिकारी सफाई कर्मचाऱयांच्या वेतनामधून तीन ते चार हजार रुपये बळकावत आहेत, असा गंभीर आरोप दीपक वाघेला यांनी केला. यावेळी अभिषेक कंग्राळकर, प्रवीण खिलारे आणि अदिलखान पठाण यांच्यावर त्यांनी आरोप केला आहे. हे तिघेही गेली अनेक वर्षे सफाई कर्मचाऱयांच्या वेतनामधून रक्कम लाटत आहेत. त्याची सीओडीमार्फत चौकशी करावी आणि त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

Related Stories

अनगोळच्या स्मशानभूमीची अवस्था दयनीय

Omkar B

विविध मागण्यांसाठी विणकरांचे जिल्हाधिकाऱयांना निवेदन

Amit Kulkarni

आता वातानुकूलित बसेसही मार्गांवर

Amit Kulkarni

1 कोटीच्या मुद्देमालासह 7 दरोडेखोर जेरबंद

Patil_p

आणखी 11 जण कोरोनामुक्त

Patil_p

बेळगावच्या वैभवात भर घालणारी नवी सिल्क शोरुम ‘राजगणपती सिल्क’

Patil_p
error: Content is protected !!