तरुण भारत

आंदोलक महिला शेतकऱ्यांना ट्रकने चिरडलं

ऑनलाईन टीम / चंदीगढ

गेल्या काही दिवसांपुर्वी उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरीत येथे केंद्रीय गृह राज्यमंत्र्यांच्या जीपखाली आंदोलक शेतकऱ्यांना चिरडल्याच्या मुद्यावरुन देशभर संतापाचे वातावरण पसरले होते. हे वातावरण निव्वळत असतानाच अशीच घटना हरियाणातील बहादूरगडमध्ये आज दि. २८ ऑक्टोबर रोजी घडली आहे. या बहादूरगडमध्ये एका भरधाव ट्रकने आंदोलन करणाऱ्या ६ महिला शेतकऱ्यांना चिरडलं आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास ही घटना घडली आहे.

आंदोलक महिला रस्ता दुभाजकावर बसल्या असता यावेळी भरधाव ट्रक अचानक थेट दुभाजकावर चढला. आणि महिलांना चिरडले आहे. यात २ महिलांचा मृत्यू झाला, तर इतर ४ महिला गंभीर जखमी होत्या. यातील एका महिलेचा उपचारादरम्यान. मृत्यू झाला आहे. या सर्व महिला पंजाबमधील मानसा जिल्ह्याच्या रहिवासी असुन. महिला सकाळी घरी जाण्यासाठी रिक्षाची वाट पाहत दुभाजकावर थांबल्या असता. त्याचवेळी उड्डाणपुलाखाली एका ट्रकने त्यांना चिरडलं असल्याची माहिती समोर आली आहे.

केंद्र सरकारच्या नव्या ३ कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबर २०२० पासून दिल्लीच्या सीमेवर विविध शेतकरी संघटना आंदोलन करत आहेत. या महिला देखील या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या यावर राष्ट्रीय काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी संतप्त होत यावर प्रतिक्रीया दिली आहे. ही क्रुरता आणि द्वेष आपल्या देशाला उद्ध्वस्त करत आहे, असं मत राहुल गांधींनी व्यक्त केलं.

Advertisements

Related Stories

आसामच्या एनडीएफबीशी शांतता करार

Patil_p

सोनू सूदसोबत काँग्रेस नेत्यांची गुप्त बैठक

Patil_p

उत्तराखंडात 2,160 नवे कोरोना रुग्ण ; 24 मृत्यू

Rohan_P

अफगाणिस्तानात तालिबान करत असलेल्या कामांवर बारकाईनं लक्ष ठेवणार – बायडन

Abhijeet Shinde

दिल्लीत बाधितांची संख्या 6.80 लाखांच्या उंबरठ्यावर!

Rohan_P

सावर्डे बुद्रुक माजी सैनिकाच्या खुनाशी मांडूळ विक्रीचा संबंध नाही

Sumit Tambekar
error: Content is protected !!