तरुण भारत

वडोदरामध्ये एअरक्राफ्ट रेस्टॉरंट

विमानात बसून खाण्याची मजा

गुजरातमधील वडोदरा येथे एअरक्राफ्ट रेस्टॉरंट सर्वसामान्य जनतेसाठी खुले झाले आहे. हे जगातील नववे एअरक्राफ्ट थीमयुक्त रेस्टॉरंट आहे. स्क्रॅप विमानाचा वापर करत तयार करण्यात आलेले हे भारतातील चौथे रेस्टॉरंट आहे. वडोदरासह एअरक्राफ्ट रेस्टॉरंट पंजाबमधील लुधियाना, हरियाणातील अंबाला आणि उत्तराखंडच्या देहरादून शहरात देखील आहे.

Advertisements

1.40 कोटीत खरेदी

हे अनोखे रेस्टॉरंट वडोदरा शहराच्या तरसाली भागात तयार करण्यात आले आहे. बेंगळूरमधील एका कंपनीकडून 1.40 कोटी रुपयांमध्ये एअरबस 320 स्क्रॅप विमान खरेदी केले होते. विमानाचे काही सुटे भाग वेगळे करून वडोदरा येथे आणले गेले आणि त्यानंतर त्याला रेस्टॉरंटचे स्वरुप देण्यात आल्याची माहिती रेस्टॉरंटचे मालक एम.डी. मुखी यांनी दिली आहे.

रेस्टॉरंट तयार करण्यासाठी मोठा कालावधी लागला. कोरोना महामारीमुळे रेस्टॉरंट सुरू करण्यास सुमारे दीड वर्षाचा विलंब झाला. विमानाला रेस्टॉरंटचा लुक देण्यासाठी 60-65 लाख रुपयांचा अतिरिक्त खर्च आला आहे. यामुळे आता याची किंमत 2 कोटी रुपयापर्यंत पोहोचल्याचे मुखी म्हणाले.

फ्लाइटप्रमाणे सेंसर्स

येथील वेटरला पाचारण करण्यासाठी फ्लाइटप्रमाणेच सर्व सेंसर्स विमानात लावण्यात आले आहेत. तसेच सर्व वेटर आणि सर्व्हर एअर होस्टेस आणि स्टीवर्डप्रमाणे दिसतात. याचमुळे लोकांना विमानात बसल्याची अनुभूती प्राप्त होते. रेस्टॉरंटमध्ये पंजाबी, चायनीज, कॉन्टिनेंटल, इटालियन, थाई आणि मेक्सिकन खाद्यपदार्थांचा आनंद घेता येतो.

टेकऑफ सारखे व्हायब्रेशन या रेस्टॉरंटच्या ग्राहनांना खऱया विमानात बसल्यासारखे वाटावे म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. विमानात टेकऑफ सारखे व्हायब्रेशन देखील होते. व्हायब्रेशनपूर्वी क्रू-मेंबर्सप्रमाणेच अनाउंसमेंट केली जाते.

Related Stories

दरवर्षी 65 कोटींचे उत्पन्न मिळवून देणारी ‘मछली’

Amit Kulkarni

प्रत्येकाला गुरू मानून शिकत गेलो : सुबोध भावे

prashant_c

लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्तमंदिर : यंदा केवळ विश्वस्तांच्या उपस्थितीत दत्तजन्म सोहळा

Rohan_P

महालक्ष्मी मंदिरातील उत्सव मूर्तींची धान्यतुला व सोने-चांदी पुष्पअर्पण

Rohan_P

पावसाचे गाव, मेघालय त्याचे नाव!

Patil_p

महाराष्ट्राच्या अथर्व लोहार आणि देवेश भईया ला ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’

prashant_c
error: Content is protected !!